वाहन मार्केट

तुम्ही 7 सीटर कार खरेदीचा विचार करताय, 10 लाखापेक्षा कमी किंमतीच्या कारसबद्दल जाणून घ्या

वेगवान नाशिक

वेगवान नाशिकः कुठल्याही कारची खरेदी करताना ग्राहक विविध पातळ्यांवर कारची पडताळणी करुन पाहत असतो. कारचा लूक, मायलेज, इंजिन, सेफ्टी फीचर्स आदींचा त्यात समावेश असतो. या शिवाय सिटींग कपॅसिटी किती आहे, हा भागदेखील अत्यंत महत्वाचा असतो. जर तुम्ही देखील 7 सीटर कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही या लेखात तुम्हाला विविध 7 सीटर कार्सचे पर्याय सांगणार आहोत, ज्यांची किमत 10 लाखांपेक्षाही कमी आहे

. या कार्समध्ये किआ कॅरेंस ), महिंद्रा बोलेरो (), मारुती इर्टीगा या सर्वाधिक लोकप्रिय कार्सचा समावेश आहे. या शिवाय या सर्वांची किंमतही 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या कार्सच्या किमती, फीचर्सबाबत या लेखात चर्चा करु.

किआ कॅरेंस

किआने या वर्षीच्या सुरुवातीलाच किआ कॅरेंसचे लाँर्चिंग केले होते. 7 सीटर कॉन्फिगरेशन आणि 10 लाखांच्या आत किंमत असलेल्या काही निवडक कार्सपेकी किआ कॅरेंस एक आहे. या कारची किंमत 9.59 लाख रुपयांपासून सुरु होते. 17.70 लाख रुपयांपर्यंत विविध 19 व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये कॅरेंसच्या टॉप मॉडेलची किंमत 17.50 लाख रुपये आहे. तर डिझेलमध्ये 11.40 लाख रुपये किंमत आहे. ऑटोमॅटीक व्हर्जनची किंमत 14.80 लाख रुपयांपासून सुरु होते.

महिंद्रा बोलेरो नियो

महिंद्रा बोलेरो नियोनेदेखील एसयुव्ही सेगमेंटमध्ये 10 लाख रुपयांच्या प्राइस ब्रॅकेटअंतर्गत बोलेरो नियोची घोषणा केली होती. बोलेरो नियो सात सीटर कॉन्फिगरेशसोबत उपलब्ध आहे. बोलेरो नियोची किंमत 9.29 लाख रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी इर्टीगा

मारुती इर्टीगाला सुरुवातीला एमपीव्ही सेक्शनमध्ये टोयोटा इनोव्हाला टक़्कर देण्यासाठी लाँच करण्यात आले होते. इर्टीगा 1.5 लीटर इंजिनसह उपलब्ध आहे. सीएनजीचा पर्यायदेखील यात मिळू शकतो. मारुती सुझुकी इर्टीगाची किंमत 8.35 लाख रुपयांपासून 12.79 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार 9 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये इर्टीगाचे टॉप मॉडेलची किंमत 12.79 लाख रुपये आहे. सीएनजीमध्ये 10.44 लाख तर ऑटोमॅटीक व्हर्जनमध्ये 10.99 लाख रुपयांपासून सुरुवात होते.

रेनॉल्ट ट्राइबर

कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर राखून ठेवल्यावरदेखील ट्राइबर सात सीटर कॉन्फिगरेशनसह उपलब्ध आहे. या कारची किंमत 5.76 लाख रुपयांपासून सुरु होते. विविध व्हेरिएंटमध्ये खरेदी केल्यावरही या कारची किंमत 10 लाखांच्या आतच आहे.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा बोलेरोची किंमत भलेही जास्त नसली तरी ही गाडी आपल्या प्राइस सेगमेंटमधील अनेक एसयुव्ही कारला मागे टाकते. महिंद्रा बोलेरोची सुरुवातीची किंमत 9.33 लाख रुपये आहे.

डेटसन गो प्लस

डेटसेन गो प्लस एक बजेट कार आहे. कार 1.2 लीटर, 3 सिलेंडर इंजिनसह उपलब्ध आहे. या कारची किंमत केवळ 4.25 लाख रुपयांपासून सुरु होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!