या दोन आयपीओने गुंतवणूकदारांना मिळवून दिला फायदा

Buisness Batmya
मुंबई : देशातील सर्वात मोठा एलआयसी आयपीओने निराशा केल्याने आज भांडवली बाजारात दोन कंपन्यांनी प्रवेश केला. त्यातील देल्हिवरी लिमटेडने राष्ट्रीय शेअर बाजारात आणि व्हिनस पाईप्स या कंपनीनं प्रवेश केला आहे.त्यामुळे या शेअरची सकारात्मक नोंदणी झाल्याने आयपीओ’मध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान मालवाहतूक आणि पुरवठा साखळी असलेल्या देल्हीव्हेरी लिमिटेडने आज २४ मे रोजी भांडवली बाजारात प्रवेश केला असून, राष्ट्रीय शेअर बाजाराता घंटा नाद करुन देल्हीव्हेरी लिमिटेडचा शेअर ४९५ रुपयांना सूचीबद्ध झाला. त्यामुळे आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत तो २ टक्के वाढीसह नोंद झाली आहे.
Stock Market TATA च्या कंपनीने कमालच केली! १ लाखाचे झाले १.४२ कोटी
तसेच देल्हीवरीने समभाग विक्रीतून ५,३२५ कोटी रुपयांचे भांडवल उभारले असल्याने हा आयपीओ ११ मे ते १३ मे २०२२ पर्यंत खुला होता. तर या योजनेत प्रत्येक समभागासाठी ४६२ ते ४८७ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे आज शेअर बाजारात घसरण झाली असली तरी देल्हीवरीने मात्र गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला आहे.
व्हिनस पाईप्स अॅंड ट्यूब या कंपनीने देखील आज मुंबई शेअर बाजारात दिमाखात प्रवेश केला आहे. तसेच शेअर बाजारात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कोठारी यांनी घंटानाद करुन या शेअरची नोंदणी केली. तर बीएसईवर व्हिनस पाईप्सची ३३५ रुपयांना नोंदणी केली आहे. हा आयपीओ ११ ते १३ मे २०२२ पासून खुला झाला होता. तर त्याचे समभाग विक्रीतून कंपनीनं १६५ कोटींचे भांडवल उभारले. या आयपीओसाठी प्रती शेअर ३१० ते ३२६ रुपयांचा किंमत पट्टा निश्चि्त करण्यात आला असून, हा आयपीओ १६.३१ पटीने सबस्क्राईब झाला होता.