उद्योग / व्यवसाय

या शेअरने 1 लाखाचे झाले 30 लाख रुपये

Buisness Batmya

सध्या शेअर बाजारात चढ उतार सुरू असतानाही गेल्या 15 दिवसांत Brightcom Group च्या शेअर्सनी जवळपास 70 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षांत या शेअरने 2905.95 टक्के एवढा परतावा दिला आहे. त्यामुळे या स्टॉकमध्ये जर कुणी 3 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आज त्याचे एक लाख रुपयांचे 30 लाख रुपये झाले असते.

तसेच हा स्टक केवळ 22 दिवसांत 29.90 वरून 50.50 रुपयांवर पोहोचला असून, गेल्या 15 दिवसांत या स्टॉकने 68.90 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र, जर गेल्या एक वर्षांचा विचार केला तर, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 140.48 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण: अनेक नाण्यांमध्ये 10% पेक्षा जास्त घसरण

दरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेन्जमध्ये बुधवारी सर्वाधिक ट्रेड होणाऱ्या securities मध्ये ब्राइटकॉम ग्रुपचाही समावेश आहे. यात आरआयएल (134.45 कोटी रुपये), एसबीआय (75.32 कोटी रुपये), टीसीएस (68.49 कोटी रुपये), वेदांत (58.29 कोटी रुपये), इंफोसिस (49.95 कोटी रुपये), एचडीएफसी बँक (41.93 कोटी रुपये) ), लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज एनएसई 7.92% लिमिटेड (38.85 कोटी रुपये), आयसीआयसीआय बँक (38.24 कोटी रुपये), ब्राइटकॉम ग्रुप (37.20 कोटी रुपये) आणि पॉलिसी बाजार (32.93 कोटी रुपये) सारख्या स्टॉक्सचा समावेश आहे.

शेअर मार्केट : शेअर बाजार तेजीत बंद, सेन्सेक्स 284 अंकांनी वधारला

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!