LIC IPO विमाधारकांसाठी 10 टक्के शेअर राखीव
business batmya
नवी दिल्लीः एलआयसीचे एकूण 632 कोटी शेअर्स (Share) असतील, त्यापैकी सुमारे 31.6 कोटी शेअर्स आयपीओद्वारे विकले जातील. सेबीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित माहितीपत्रकानुसार, जीवन विमाधारकांचा आयपीओ खरेदीचा दावा आणखी मजबूत होणार आहे.
Gold prices सोन्याचे भावात तेजी, चांदीतही वाढ
ज्या गुंतवणुकदारांकडे आधीपासूनच एलआयसीची पॉलिसी (LIC) आहे, अशांसाठी या आयपीओमध्ये 10 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहेत. म्हणजेच अशा विमाधारकांना आयपीओमध्ये गुंतवणुकीची अधिक संधी उपलब्ध झाली आहे.
new smart phones अवघ्या 6 हजार आला नवीन स्मार्ट फोन
LIC IPO : आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच एलआयसीचा आयपीओ आणण्याची तयारी सरकार करत आहे. एलआयसी आयपीओचा मसुदा (DRHP) सरकारने रविवारी सायंकाळी उशिरा बाजार नियामक प्राधिकरण सेबीकडे सादर केला.
देशातील गुंतवणुकदार आतुरतेने वाट पाहत असलेल्या एलआयसी आयपीओचा मुहूर्त अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.
एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर भांडवलाच्या आधारे बाजारात देशातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर असेल आयपीओसंदर्भात सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सरकार 31 कोटी इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे.
एलआयसी हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा विमा ब्रँड
अशा परिस्थितीत या प्रचंड आयपीओमुळे बाजारात गुंतवणुकदारांची संख्या झपाट्याने वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
भारतात एलआयसीच्या सुमारे 290 दशलक्ष पॉलिसी आहेत, अनेकजणांकडे एकापेक्षा जास्त पॉलिसी आहेत. अशा स्थितीत पॉलिसीधारकांची एकूण संख्या 20 ते 25 कोटींच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज आहे.
3.16 कोटी शेअर्स राखीव
या आयपीओमध्ये एलआयसीच्या विमाधारकांसाठी शेअर्स राखीव ठेवण्यात येणार असल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडे यांनी नुकतेच सांगितले होते.मसुद्यानुसार, या आयपीओमध्ये एलआयसीच्या विमाधारकांसाठी स्वतंत्र हिस्सा ठेवण्यात आला आहे. एलआयसीच्या विमाधारकांसाठी 10 टक्के म्हणजे सुमारे 3.16 कोटी शेअर्स राखीव ठेवण्याचा प्रस्ताव या मसुद्यात आहे.
सेबीने 3 आठवड्यात मागितली मंजुरी
यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एलआयसी आयपीओ साठीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते.सरकारसाठी निर्गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आयपीओ खूप खास आहे. त्यामुळेच 31 मार्चपूर्वी हा आयपीओ बाजारात यावा यासाठी सरकार मसलत आणि कसरत करत आहे.
त्यानुसार, या 31 मार्चपूर्वी जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली एलआयसी बाजारात सुचीबद्ध होईल.1956 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एलआयसीच्या शेअर्सच्या अधिग्रहणासाठी सरकारला प्रति शेअर 16 पैसा खर्च येणार असल्याची माहिती सेबीकडे दाखल माहितीपत्रकात देण्यात आली आहे.