वाहन मार्केट

long-car100 फुट लांब कार, हेलिपॅड, पोहण्याचा तलाव, गुनीज बुकातचं नोंद

business batmya

नवी दिल्लीः100 feet long car, helipad, swimming pool, Guinness Book of Records  तुम्ही 100 फुट लांब कार पाहिली आहे का? सध्या 100 फुटांपेक्षा जास्त लांब कारची जोरदार चर्चा आहे. या कारमध्ये केवळ बसण्याची जागा नाही तर हेलिपॅड, गोल्फ कोर्स, स्विमिंग पूल अशा सुविधाही आहेत. आतापर्यंत तुम्ही अनेक लहान-मोठ्या गाड्या पाहिल्या असतील, त्यापैकी काही रस्त्यांवर पाहिल्या असतील तर काही फोटोंमध्ये मात्र ही कार तुम्हाला थोड विचार करण्यास भाग पाडणार आहे.

कारमध्ये फक्त सीट्सच नव्हे तर स्विमिंग पूल, वॉटर बेड, डायव्हिंग बोर्ड, बाथटब, गोल्फ कोर्स, हेलिपॅड देखील आहे. यात 75 लोक बसू शकतात. या हेलिपॅडचे वजन पाच हजार पाऊंडांपर्यंत असू शकते. टीव्ही, फ्रीज, टेलिफोन अशा सुविधाही यात आहेत.ही कार केवळ लांबच नाही तर तिचा एक्सपीरियन्सदेखील चांगला आहे. 100 feet long car, helipad, swimming pool, Guinness Book of Records

अमेरिकन ड्रीम असे या कारचे नाव असून ती 30.54 मीटर म्हणजेच 100 फुटांपेक्षा जास्त लांब आहे.या कारची नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या Jay Ohrberg नावाच्या व्यक्तीने ही कार बनवली आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकन ड्रीम्स चर्चेत आहे. अमेरिकन ड्रीम ही जगातील सर्वात लांब कार आहे. या कारची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही कार 1986 मध्ये बनवण्यात आली होती. 100 feet long car, helipad, swimming pool, Guinness Book of Records

आता एका व्यक्तीने नुकतीच रिडिझाईन केली आहे. त्यानंतर कारने स्वतःचाच विक्रम मोडला. आता पुन्हा एकदा ही कार जगातील सर्वात लांब कार बनली आहे. ही कार पहिल्यांदा 1986 मध्ये तयार करण्यात आली होती, जेव्हा तिची लांबी 60 फूट इतकी होती. ही गाडी अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती.

ठराविक कार 10 ते 15 फुटांपर्यंत असतात. पण ही कार 100 फुटांची आहे. या कारने सर्व वाहनांचे रेकॉर्ड तोडले आहेत. अमेरिकन ड्रीम्स दोन्ही बाजूंनी चालवता येतात. या कारची लांबी 100 फूट आहे. या कारच्या दोन्ही बाजूला 26 टायर आणि दोन इंजिन आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!