शेयर मार्केट

penny stock १४ रुपयांच्या शेअरनं दिले १६० टक्के रिटर्न

business batmya

Multibagger penny stock: गेल्या काही महिन्यांपासून भारतीयशेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव असला तरी काही शेअर्सनं या काळात चांगली कामगिरी केली आहे.

कोहिनूर फूड्सचे (Kohinoor Foods Ltd) चे शेअर्स त्यापैकी एक आहेत. या पेनी स्टॉकने सलग 35 ट्रेडिंग सत्रांमध्ये अपर सर्किटला हिट केलं आहे. जवळपास दोन महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक ₹7.75 वरून ₹38.40 प्रति शेअरच्या स्तरावर गेला आहे. या कालावधीत सुमारे 395 टक्के वाढ नोंदवली गेली.

हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या एका महिन्यात ₹14.85 वरून ₹38.40 पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत यात जवळपास 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या दोन महिन्यांत 7.75 रुपयांवरून 38.40 रुपयांपर्यंत वाढला असून या कालावधीत जवळपास 395 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या एक वर्षापासून हा स्टॉक बंद होता आणि या पेनी स्टॉकमध्ये व्यवहार सुरू झाल्यानंतर आता तो नियमितपणे वाढत आहे.

कोहिनूर फूड्सच्या शेअर प्राईज हिस्ट्रीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाखाचे मूल्य आज 2.60 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये दोन महिन्यांपूर्वी 7.75 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या ₹1 लाखाचं मूल्य आज ₹4.95 लाख झाले असते. सध्या कंपनीचं मार्केट कॅप ₹ 142.35 कोटी रुपये आहे.

जोडलं गेलं अदानींचं नाव

या महिन्याच्या सुरुवातीला, अदानी विल्मर लिमिटेड (AWL) ने मॅककॉर्मिक स्वित्झर्लंड जीएमबीएचकडून दिग्गज कोहिनूर ब्रँडसह अनेक ब्रँड्स खरेदी करण्याची घोषणा केली होती. यामुळे AWL ला भारतातील कोहिनूर बासमती तांदूळ ब्रँड आणि कोहिनूर ब्रँड अंतर्गत त्यांच्या रेडी-टू-कुक, रेडी-टू-इट, करी आणि फूड पोर्टफोलिओचे विशेष अधिकार मिळतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. या वृत्तानंतरच कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!