मोबाईल

फक्त २ रुपये जास्त मोजून दररोज ३ जीबी डेटाःजिओला टक्कर

 

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने यूजर्ससाठी अनेक जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर केले आहेत. जर तुम्हाला जास्त डेटा खर्च करायची सवय असेल तर कंपनीच्या पोर्टफोलियोत तुमच्यासाठी कमालीचे ऑप्शन उपलब्ध आहेत. वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाचा प्लान यापैकी एक आहे. जिओचा ८९९ रुपयाचा प्लान पेक्षा फक्त २ रुपये जास्त किंमतीचा हा प्लान आहे. परंतु, बेनिफिट्स मध्ये हा प्लान जिओला जोरदार टक्कर देत आहे. कंपनीचा ९०१ रुपयाचा प्लान ७० दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी दररोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे प्लानमध्ये तुम्हाला ४८ जीबी एक्स्ट्रा डेटा सुद्धा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये रोज २.५ जीबी डेटा मिळतो. जाणून घ्या या प्लानसंबंधी सविस्तर.

वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाचा प्लान
कंपनी या प्लानमध्ये ७० दिवसाची वैधता ऑफर करते. इंटरनेट यूज करण्यासाठी या प्लानमध्ये तुम्हाला डेली ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये ४८ जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अनेक शानदार अतिरिक्त बेनिफिट्स मिळते.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

प्लानध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिटमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. याशिवाय, वोडाफोन आयडियाचा हा प्लान बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि वोडाफोन आयडिया मूव्हीज आणि टीव्ही अॅपचे फ्री अॅक्सेस देते. प्लानमध्ये कंपनी डेटा डिलाइट्स बेनिफिट् दर महिन्याला २ जीबी पर्यंत बॅक अप डेटा सुद्धा ऑफर केले जाते.

जिओचा ८९९ रुपयाचा प्लान
रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लान अनेक जबरदस्त बेनिफिट्स सोबत येतो. या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये कंपनी डेली २.५ जीबी या हिशोबाप्रमाणे एकूण २२५ जीबी डेटा देत आहे. कंपनी या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस देत आहे. प्लानमध्ये मिळणारे अतिरिक्त बेनिफिट मध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारख्या अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः मस्तच! अँड्रॉईडमध्ये येणार आयफोनसारखा फील, Whatsapp मध्ये होतोय हा मोठा बदल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!