कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना 1 वर्षात 720 कोटींचा निधी
buisness batmya
नवी दिल्लीः कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना अनेकवेळा आर्थिक रसद पुरविण्याचं काम केले जाते. तसा या कंपन्यांकडून पक्षाच्या विकासासाठी पार्टी फंड देण्यात येत असल्याने त्यातून राजकीय पक्ष आपले आर्थिक गणित आखून पक्ष संघटना वाढीसाठी जोर लावत असतात. तसेच पक्षांना निधी दिला जातो त्या हीशोबानुसार , कॉर्पोरेट कंपन्यांकडून गेल्या 2019-20 या आर्थिक वर्षात देशातील राजकीय पक्षांना तब्बल 921.95 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.720 crore in 1 year to political parties from corporates
दरम्यान कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना जो निधी देण्यात आलेला आहे त्यापैकी सर्वात जास्त निधी भाजपला देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपला 720.407 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र, कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सने (सीपीएम) कॉर्पोरेट कंपन्यांकडून एक रुपयाचीही निधी घेतला नसल्याचे एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Stock market या दोन शेयर्समुळे झुनझुवालांना मिळाले बेफाम पैसे
तसेच एडीआरच्या अहवालानुसार, 2017-18 आणि 18-19 या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यांकडून देशातील राष्ट्रीय पक्षांना देण्यात आलेल्या निधींमध्ये 109 टक्क्यांची वाढ झाली असून त्यात एडीआरने 5 राजकीय पक्षांचे विवरण दिले आहे. त्यामध्ये, भाजप, काँग्रेस, एनसीपी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स यांचा समावेश आहे. त्यात फ्रुडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टने 2019-20 मध्ये भाजप आणि काँग्रेसला सर्वाधिक डोनेशन दिल्याने , ट्रस्टने एकाच वर्षात या दोन्ही पक्षांना 38 वेळा दान केले असून त्याची एकूण रक्कम 247.75 कोटी एवढी आहे. तसेच कंपनीने भाजपला 216.75 कोटी रुपये दिल्याने काँग्रेसला 31 कोटी रुपये मिळाले आहेत.
पेट्रोल -डिझेल स्वस्त होणार ? केंद्राने आखला हा प्लॅान
याआधी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ने 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी दिला आहे. तसेच प्रूडेंट ही सर्वात श्रीमंत निवडणूक ट्रस्ट असून, ही कंपनी 2013-14 पासून भाजपाला सर्वाधिक फंड देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. म्हणूनच रिपोर्टनुसार, 2012-13 पासून 2019-20 पर्यंत, राष्ट्रीय पक्षांना 2019-20 (17व्या लोकसभेच्या दरम्यान) सर्वाधिक 921.95 कोटींचा कॉर्पोरेट निधी मिळाला असून, 2018-19 मध्ये 881.26 कोटी आणि 2014-15 (16व्या लोकसभा निवडणुकांवेळी) 573.18 करोड़ रुपये फंड मिळाला होता.
2019-20 मध्ये देण्यात आलेलं कॉर्पोरेट डोनेशन 2012-13 आणि 2019-20 च्या कालावधीतील एकूण डोनेशनच्या 24.62 टक्के एवढं आहे. सन 2012-13 आणि 2019-20 दरम्यान, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संघटनांकडून राष्ट्रीय पक्षांना देण्यात आलेल्या डोनेशमध्ये 1,024 टक्क्यांची वाढ झाली आहे.