NOKIA चा 8210 4G फोन; किंमत 4 हजार रुपयांपेक्षा कमी

buisness batmya
Nokia 8210 4G भारतात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि तो Amazon आणि Nokia च्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. तसेच या फोनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा लुक क्लासिक फीचर फोनसारखा आहे आणि तो 4G कनेक्टिव्हिटीसह येतो. नोकियाचा दावा आहे की हा फोन सिंगर चार्जवर 27 दिवसांच्या स्टँडबाय टाइमसह येतो. विशेष बाब म्हणजे कंपनी Nokia 8210 4G च्या ग्राहकांना एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी देत आहे.
तर नोकियाचा हा फीचर फोन झूम UI आणि वापरण्यास सुलभ इंटरफेससह 2.8-इंच डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा एक फीचर फोन असून या Nokia 8210 4G चा डिस्प्ले बाकी फीचर फोन पेक्षा थोडा मोठा आहे. यामध्ये, क्लासिक नोकिया 8210 बॉडी पुन्हा डिझाइन आणि उत्कृष्ट लुकसह सादर करण्यात आली आहे.
स्वस्तात मस्त Realme चा शानदार स्मार्टफोन; किंमत 7 हजारांपेक्षा कमी
दरम्यान या फोनमध्ये स्नेक, एरो मास्टरसारखे इन-बिल्ट गेम्स आहेत. Nokia 8210 4G दोन रंग पर्यायांमध्ये येतो. तसेच हा फोन Unisoc T107 चिपसेटसह सुसज्ज आहे, आणि यात 128MB अंतर्गत स्टोरेजसह 48MB रॅम आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे ज्याच्या सहाय्याने त्याची स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा म्हणून, नवीन नोकिया फीचर फोनला मागील बाजूस 0.3MP कॅमेरा मिळतो. हे ड्युअल-नॅनो सिम पर्यायासह येते आणि वायर्ड आणि वायरलेस दोन्ही मोडसह एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडिओ सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. नोकिया 8210 4G फोनमध्ये ब्लूटूथ आवृत्ती 5.0 आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आहेत. तसेच पॉवरसाठी, या फोनमध्ये 1450mAh बॅटरी आहे, जी एका चार्जवर 27 दिवसांपर्यंत स्टँडबाय वेळ देते.