महाराष्ट्र
सोने दरात मोठी घसरण

buisness batmya
मुंबई : सध्या या दिवसांमध्ये लग्नसराई असल्याने ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे जास्त असतो. त्यात सोन्या चांदीच्या दरात आपल्याला सातत्याने चढ उतार झाल्याचे पाहायला मिळत असते. अशातच अनेक जागतिक बाजारांमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारांमध्येही दिसत असून, आज सोन्याची किंमत तब्बल 1500 रूपयांनी घसरली आहे.A big drop in gold prices
सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे सोने गेल्या 3 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर घसरले असून, सध्याचे सोने चांदीचे भाव हे आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचे दर 50158 रुपये प्रति तोळे इतके झाले होते. त्यामुळे सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ झाली. परंतु त्यानंतर अचानक सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत गेली. तसेच चांदीच्या दरांमध्येही घसरण नोंदवण्यात आली असून चांदीचा दर 58920 रुपये प्रति किलो इतके होते.
Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,158 अंकांनी घसरला
मुंबईतील आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 51,490 रुपये प्रति तोळे इतके होते. कालच्या सोन्याच्या दरापेक्षा मुंबईतील आजच्या सोन्याच्या दरांमध्ये 1000 रुपयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. तर चांदीचे दर 60,800 रुपये प्रति किलो इतके होते.
एलआसी आयपीओ शेअर्सचे आज वाटप होण्याची शक्यता