या समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण

Buisness Batmya
शेअर बाजारात आज मोठी पडझड पाहायला मिळत असून बाजार उघडताच सेन्सेक्स 60,000 च्या खाली घसरला. बँक निफ्टीतही मोठी घसरण दिसून येत असून सेन्सेक्स आणि निफ्टीचे निर्देशांक आज घसरणीसह खुले झाल्याचं पाहायला मिळाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त काल देशांतर्गत शेअर बाजार बंद होते. मात्र आज बाजारातील ट्रेडिंगसाठी संकेत खूपच वाईट असून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी पडझड दिसून येत आहे. त्यात आज सेन्सेक्स 506 अंकांनी म्हणजेच, 0.84 टक्क्यांच्या घसरणीसह 59,698 वर पोहचला. तर, निफ्टी 128 अंकांच्या म्हणजेच, 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह 17,763.35 वर व्यवहार करत आहे.
या शेअरने अवघ्या ४९ हजारांची गुंतवणूकीने गुंतवणूकदार झाले कोट्याधीश
अदानी समूहाचे गडगडले शेअर्स
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही घसरण असून अदानी विल्मर 5 टक्क्यांनी घसरला असून तो 516.85 रुपयांवर आला आहे. तर अदानी पोर्ट्समध्ये सुमारे 3 टक्के घसरण झाली असून ती प्रति शेअर 691.90 रुपये आहे. तसेच अदानी पॉवरमध्येही 5 टक्के घट झाली असून त्याची किंमत प्रति शेअर 247 रुपयांपर्यंत खाली आली आहे. अदानी एंटरप्रायझेस, ज्यांचा एफपीओ (FPO) आज आला आहे, 2.27 टक्क्यांनी घसरून 3311.90 रुपये प्रति शेअर आहे.
तसेच अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 13.65 टक्क्यांची घसरण असून हा शेअर 2174 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या शेअरमध्ये 343 रुपयांची घसरण दिसून येत आहे. तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 10.07 टक्क्यांनी घसरल्यानंतर 187 रुपयांनी घसरून 1670.65 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.