Daily Newsशेती

महाराष्ट्रात शेतक-याला सापडली सोन्याची विहीर! पोलीसांनी केली विहीर सील video

बिजनेस बातम्या / विजय चौधरी 

संभाजी नगर, सोयगाव, ता.- 5 में 2024 – कोणाच्या नशिबात काय असेल तर कोणाच्या नशिबात काय?  जमिनीमध्ये काय  धन लपलयं कोणालाच ठाऊकं नसते.  आपण साधं पाण्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला अनेक ठिकाणी बोरवेल करावे लागतात किंवा विहिरी खोदाव्या लागतात. तेंव्हा कुठ पाण्याचा शोध लागतो. मात्र संभाजीनगर मधील सोयागाव येथे एक शेतक-याला सोन्याची खानचं सापडली आहे. 

अजीत पवारांनी पवारांची औलाद का काढली !Maharastra Politics

हा प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर मधील सोयगाव तालुक्यातील सोयगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बनोटी पोलीस दुरक्षेत्रातील बनोटी चाळीसगाव रस्त्यावरील मधूबन हॉटेल च्या पाठीमागे असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीचे खोदकाम सुरू असताना पन्नास फुटावर पश्चिम दिशेच्या बाजूने 10 फुटाच्या जवळपास चक्क सोन्याची खान सापडली आहे.

Onion export शेतक-यांनी केंद्र सरकार झुकविलेःकांद्याची निर्यात खुली

हे सोनं म्हणजे मूल्यवान अशी गौणखनिज म्हणून ओळख असलेली रंगबेरंगी आकर्षित करणारी गारगोटी दगड आहे.  यांची माहिती बनोटी पोलिसांना मिळतात रात्री उशिरापर्यत सदरील शेतकऱ्यांला नोटीस देऊन विहिरीचे काम बंद करण्यास सांगून पोलिसांनी तहसील विभागाला याबाबत माहिती दिली आहे..

अशी रंगीबेरंगी आकर्षित करणार गार ही कोणाच्याही विहीरीला लागत नाही. कारण या गारगोटीचा भाव काही लाखांमध्ये असतो. आणि जर अशी गार सापडली तर तिच्यावर शासकीय विभागाचे लक्ष असते. हा रंगीबेरंगी गारगोटी  दगड लाखो रुपये किमतीला विकल्या जातो.

Success Story: निरमाचा प्रवास शेतक-याच्या 3 रुपयांपासून सुरु झालायं

सदर शेतक-यांनी विहीरीचे काम सुरु असतांना अचानक 50 फुट खोलीवर एका बाजूला ही गारगोटी दगड लागला यानंतर या शेतक-यांने विहीरीच्या आत 15 फुट खोल भुयर करत नेले. अजूनही पुढे हे दगड लागत गेल्यामुळे विहीरीमध्ये मोठी कपार तयार झाली. ही सोन्याची खान जरी शेतक-याच्या नशीबात असली तरी पोलीसांनी मात्र या विहिरीचे काम बंद पाडले असून महसूल विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे.

1000 रुपयात बसवा सोलर पॅनल या पध्दतीने solar panel

हे पथक अजून घटनास्थळी दाखल झालेले नव्हते. जाणकारांच्या मते विहिरीत सापडलेला हा गौनखनिज रंगबेरंगी गारांची खजाना हा 20 ते 25 लाखाच्यावर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळतात पोलीस सहायक निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, सतीश बडे ,अंमलदार श्रीकांत तळेगावे घटनास्थळी दाखल होऊन सदरील शेतकऱ्याला विहिरीचे काम बंद करण्याची नोटिस देऊन विहीर सील केली असून याची माहिती तहसील विभागाला कळविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!