SMS एक मेसज तुमच्या बॅंकेतील सर्व पैसे गायब करणार
business batmya
नाशिक : SMS message कोरोना महामारीमुळे लोक आपला बराचसा वेळ स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर घालवतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार नेमकी हीच संधी साधत आहेत. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारीची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. गुन्हेगार काही मिनिटांतच आपले बँक खाते रिकामे करतात. त्यासाठी नवनवीन फंडे वापरतात, तुम्हाला फ्रॉड कॉल करण्यात येतो. ऑफर देणारे एसएमएस पाठवला जातो. त्यात संबंधित लिंक दिलेली असते. तुमच्या ई-मेल वर आकर्षक जाहिरातीचा मेल पाठवून तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या संपूर्ण फसवणूक कांडात एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमच्या शिवाय सायबर भामट्यांना हे फसवणूक कांड करता येत नाही. तुम्हीच या फसवणुकीचे साक्षीदार आणि बळी असता. फसवणुकीच्या अनेक पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे वेबसाइट स्मिसिंग (A message will make all the money in your bank disappear)
8 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Tecno चा नवीन स्मार्टफोन
स्मिसिंग म्हणजे काय?
गुन्हेगार काही मिनिटांत आपले बँक खाते साफ करण्यासाठी काही पद्धतींचा वापर करतात. यापैकी एक पद्धत म्हणजे वेबसाइट स्मिसिंग. स्मिसिंग म्हणजे यात एसएमएस आणि फिशिंग या दोन्हींचा समावेश आहे. त्यामध्ये देशभरातील लोकांना मॅसेज पाठविण्यात येतो. आणि त्यात खात्यासंबंधी त्रुटी दूर करण्याचे देखाल सांगण्यात येते. किंवा केवायसी अद्ययावत करण्यास सांगितले जाते. मोबाईल अद्ययावत करणे, एखाद्यी ऑफर आहे असे सांगून जाळे फेकण्यात येते. ही सगळी चाचपणी करण्यासाठी संबंधित लिंक, टोल फ्री क्रमांक यांचा समावेश असलेले संदेश टाकण्यात येतात. त्यानंतर तुम्ही पुढचं पाऊल टाकले की, तुम्हाला त्याचा परिणाम लगेच आयुष्यभरासाठी लक्षात राहतो.
HDFC Life Insurance एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सला नफा होऊन उत्पन्न वाढ
वेबसाइट स्पूफिंग म्हणजे काय
आता वेबसाइट स्पूफिंग म्हणजे ही बँक फसवणुकीचा एक मार्ग आहे. आणि तो आजकाल मोठ्या संख्येने प्रकरण समोर येत आहेत. म्हणूनच वेबसाइट स्पूफिंगमध्ये बनावट वेबसाइट तयार करून, सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाच्या मदतीने खातेदाराची फसवणूक करतात.या अशा बनावट वेबसाइट्स खऱ्या दिसण्यासाठी गुन्हेगार खऱ्या वेबसाइटची नावे, लोगो, ग्राफिक्स आणि कोडदेखील वापरतात. ते ब्राउझर विंडोच्या दिसणारे बनावट यूआरएल (URL) देखील तयार करू शकतात. मग ते बाजूला पॅडलॉक आयकॉनची नक्कल करतात.सहज हाताळता येणाऱ्या गॅझेटचा सायबर भामटे शस्त्र म्हणून वापर करत आहे. यामध्ये तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप हा तुमच्याच हलगर्जीपणामुळे घरभेदी ठरतो. म्हणूनच अज्ञात स्त्रोत कडून आलेला संदेश, लिंक, टोल फ्री क्रमांक समजून घेऊनच त्यावर काहीच प्रतिक्रिया न नोंदवणे शहाणपणाचे ठरेल.
Honda Activa scooter अर्ध्या किमंतीत मिळणार तुमची आवडती स्कूटर
आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती कधीही ईमेल व मजकूर संदेश किंवा ईमेलवरून मिळालेली असेल तर ती कधीही सामायिक करू नका. आणि बॅंकेला त्यांचे नाव किंवा लोगो वापरणाऱ्या संशयास्पद ईमेलबद्दल माहिती द्या. आपल्या खात्याशी छेडछाड किंवा फसवणूक ओळखाण्यासाठी आपले खाते नियमितपणे तपासा. कारण आपली वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी बँक कधीही एसएमएस पाठवत नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला कधी तुमच्या इंटरनेट बँकिंग सिक्युरिटीचे तपशील जसे की तुमचा पिन, पासवर्ड किंवा ईमेलमध्ये खाते क्रमांक मागितला जात असेल, तर त्याला प्रतिसाद देऊ नका.
Suzuki Alto कारची खरेदी करा या भावात..म्हणजे अर्ध्या किमंतीमध्ये