(Agri Drone Farming लवकरचं सर्व शेतक-यांकडे दिसेल ड्रोन

बिजनेस बातम्या / business batmya
मंबईः (Agri Drone Farming )भारतातल्या शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याला आता राज्य सरकारही सक्रिय आहे. येत्या काळामध्ये औषध फवारणी हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे केंद्र सरकारने ड्रोन (Agri Drone Farming ) ला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. आणि यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाले आहे.
टाटा Nexon Kaziranga एडिशन लीकःकाय आहे वैशिष्टे
काळाच्या ओघात कृषी क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढीमध्ये मोलाचा हेतू ठरण्यासाठी औषधाची फवारणी करावी लागते. सध्या शेती व्यवसाय मध्ये ड्रोनचा (Agri Drone Farming ) वापर हा मुद्दा केंद्र सरकारच्या मुख्य अजेंड्यावर आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोन ची शेती केंद्रस्थानी हे भारत देशाचे होणार असल्याचं मागेच स्पष्ट केले आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन हे फिरताना दिसणार आहे.
FD in this bank या बॅंकेत जर एफडी केली तर हा मिळेल फायदा
कृषी विद्यापीठांचा अजेंडा काय ?
ड्रोनद्वारे कीटकनाशकांची फवारणी हा मुख्य मुद्दा आहे. यालाच घेऊन आता राज्यातील कृषी विद्यापीठांनी संशोधन सुरु केले आहे. सध्या ड्रोनद्वारे फवारणी करताना त्यामध्ये 10 ते 15 लिटरच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यामुळे सातत्याने ड्रोन खाली घेऊन त्यामध्ये पाणी भरावे लागणार. त्यामुळे पाणी आणि औषधांचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन सुरु असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी सांगितले आहे.
गाडी घेण्याचा विचार करतायं, या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट
कृषी संस्थांना मिळणार अनुदानाचा लाभ
ड्रोनचा प्रामख्याने वापर हा किटकनाशक फवारणीसाठी होणार आहे. त्याच अनुशंगाने ड्रोनचा वापर आणि प्रात्याक्षिके याअनुशंगाने कृषी विभाग कामालाही लागला आहे. याकरिता कृषी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना कृषी अभियांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत 75 ते 100 टक्के पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. ड्रोनसाठी 10 लाखापर्यंतचा खर्च मर्यादा ठरविण्यात आली असून कृषी विद्यापीठांना 100 टक्के तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. याकरिता कृषी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी 31 मार्चपर्यंत प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल करायचे आहेत.
…म्हणून ड्रोन ठरणार अधिक प्रभावी
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी आता हात पंपाची जागा ट्रक्टरचलित पंपाचा वापर वाढलेला आहे. यामुळे क्षेत्र फवारणीच्या मर्यादा ह्या कायमच आहेत. पण ड्रोनचा वापर सुरु झाला तर क्षेत्राची मर्यादा राहणार नाही. शिवाय कमी वेळेत अधिकेच क्षेत्र हे फवारुन होणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास केंद्र सरकारला आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर आता ड्रोन शेतीचे प्रात्याक्षिके पार पडत आहेत.
येणार काळात सर्व शेतक-यांकडे ड्रोन दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण येत्या काळात थेट शेतक-यांना सुध्दा थेट अनुदान देण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी वेळ जाईल. आता सध्या कृषी विद्यापीठांना 100 टक्के तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. याकरिता कृषी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी 31 मार्चपर्यंत प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल करायचे आहेत.