फक्त 999 रुपयांमध्ये विमान प्रवासाची संधी, 10 हजार जागांवर ऑफर

Buisness Batmya
नवी दिल्लीः जर तुम्ही स्वस्त प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही ट्रेनपेक्षा कमी दरात विमानाने प्रवास करू शकता. Flybig, रीजनल एव्हिएशन ऑफ इंडियाची नवीन कंपनी तुम्हाला ही ऑफर देत आहे. कंपनी 999 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट मिळवण्याची संधी देखील देत आहे.
दरम्यान, FlyBig ने 14 जुलैपासून सेल सुरू केला असून, ही विक्री 20 जुलैपर्यंत असेल. सेल अंतर्गत, काही मार्गांचे विमान भाडे फक्त 999 रुपयांपासून सुरू होत आहे. तसेच विक्रीदरम्यान एकूण 10 हजार तिकिटांची ऑफर देण्यात आली आहे. प्रवाशांना 999 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंतची तिकिटे दिली जात आहेत.
सिम अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी या कंपनीने आणलाय सर्वात स्वस्त प्लॅन, जाणून घ्या
निवडक मार्गांवर 999 रुपये तिकीट
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सेल दरम्यान, गुवाहाटी ते पासीघाट आणि गुवाहाटी ते रुपसी 999 रुपयांमध्ये तिकीट बुक केले जाऊ शकते. तसेच गुवाहाटी ते तेजू, हैदराबाद ते गोंदिया या मार्गांनी फक्त १५०० रुपयांमध्ये विमानाने प्रवास करता येतो. याशिवाय इंदूर ते गोंदिया, हैदराबाद ते औरंगाबाद हे तिकीट केवळ 2000 रुपयांमध्ये बुक करता येणार आहे.
तिकीट कुठे खरेदी करायचे
कंपनीच्या म्हणण्यानुसार, 25 जुलै ते 24 सप्टेंबर 2022 दरम्यान विक्रीच्या कालावधीत बुक केलेल्या तिकिटांवर प्रवास करता येईल. आणि ही तिकिटे फ्लायबिगच्या वेबसाइटवरून तुम्ही बुक करू शकता.