खेळण्याची लायब्ररी एक भन्नाट कल्पना

BUSINESS BATMYA
महाराष्ट्र : सध्याच्या पालकांना खूप भेडसावणारा विषय म्हणजे मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवणे. यासाठीचाच एक उत्तम पर्याय म्हणजेच टॉय लायब्ररी. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळण हे खूप महत्वाचे असते. खेळण्यामुळे मुलांचा बौद्धिक तसेच शारीरिक विकास झपाट्याने होतो. महागाईच्या जगात अनेक पालकांना मुलांसाठी प्रत्येक गोष्ट घेणे शक्य होत नाही, शिवाय घेतलेली खेळणी ही काही काळानंतर घरात अडगळ म्हणून पडून रहातात. त्या खेळण्यासोबत मुलं खेळली असतात त्यामुळे ती टाकून देऊशीही वाटत नाही, आपल्याला हवी ती खेळणी आपण घेऊन खेळू शकलो तर. किती मज्जा ना .
सर्व बालमित्रांसाठी ही तर लॉटरीच ठरेल. याचाच विचार करून आता एक नवीन संकल्पना उदयास येत आहे. ती म्हणजे ‘टॉय लायब्ररी ‘
तुम्ही बऱ्याचदा पुस्तकांच्या लायब्ररीत गेला असाल. अनेक पुस्तक प्रेमींसाठी पर्वणी म्हणजे पुस्तकांची लायब्ररी. पण अशीच लायब्ररी जर खेळण्याची असली तर.
खेळणी घरी न्या खेळा आणि परत करा. याच धर्तीवर टॉय लायब्ररी अनेक ठिकाणी सुरु झाल्या आहेत.
टॉय लायब्ररी मुलांच्या मनात शेरिंग आणि केअरिंगची भावना देखील वाढवते, हे टॉय आपल्याला परत करायचे आहे. हा विचार करून ती खेळणी अगदी सांभाळून वापरली जातात. आणि प्रत्येक वेळी नवनवीन खेळणी मुलांना खेळता येतात. नाशिकमध्ये कॉलेज रोड, द्वारका,नाशिक रोड , देवळाली येथे ह्या लाइब्ररीस आहेत. पालकांनी जरूर या लायब्ररीत भेट द्यावी. मुलांच्या अभ्यासाशी निगडित अनेक प्रकारची खेळणीही आपल्याला येथे पाहायला मिळतील .