नाशिक-पुणे रेल्वेसाठी भूसंपादन मुल्यांकन दराला मंजूरी
buisness batmya
नाशिकः नाशिक पुणे रेल्वेसाठी जमीन मूल्यांकन निश्चित करण्यात आले असून, ते आज जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाला तीन वर्षांतील सर्वोत्तम खरेदी मिळण्याचा शक्यता आहे. याबाबत सध्या सिन्नर तालुक्यातील गावांमधून जमींनीचे मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याने त्यामध्ये बारगाव पिंप्री, पाटपिंप्री, वाडिवऱ्हे आणि दातली या गावांमधील मूल्यांकन दराला मंजुरी मिळाली आहे. तसेच जमिनीचा पोत आणि प्रकारानुसार या किमती जाहीर करणार असल्याने अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमिनी देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या जमिनीला भाव कमी मिळणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रेल्वे विभागाने भूसंपादनाबाबत दाखल केलेल्या प्रस्तावर कार्यवाही सुरू केली असून, या प्रकल्पाचा मार्ग पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यांतून जाणार आहे. त्यासाठी 575 हेक्टर भूसंपादन केले जाणार असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातही भूसंपादन केले जाणार आहे. तसेच या कामासाठी 1500 कोटींच्या निधींची गरज असल्यामुळे त्याचा पहिला टप्प्यातील 100 कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आला आहे.
दरम्यान नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार असून, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. तर या मार्गावर एकूण 24 स्थानके देण्यात आल्याने या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार आहे.तसे ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधीचा मोठा अडथळा होता तोही अखेर दूर झाला आहे. तसेच राज्य सरकारने या कामासाठीच्या आपल्या हिश्शाच्या 32 कोटी निधीला याआधीच मान्यता दिली आहे. त्यात आता केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही 20 टक्के पैकी 19.6 टक्के निधीला मान्यता दिल्यामुळे समभागातून 60 टक्के निधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाबाबत काही वैशिष्ट्ये आहेत ती 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग, रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे, रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग असणार आहे, तसेच पुढे हा वेग 250 कि. मी. पर्यंत वाढविणार असल्याने पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापले जाणार आहे. त्यामुळे वेळेसह इंधनाची बचत होऊन पर्यावरण पूरक प्रकल्प तयार होणार. म्हणूनच पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी करण्यात आली असून त्यात 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, आणि 128 भूयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आली आहे.