उद्योग / व्यवसाय

येणा-या आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये करणार गोळा

buisness batmya

मुंबई : आयपीओमध्ये सध्या गुंतवणुकीची मोठी संधी आली असून, येणा-या आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करणार आहेत. त्यामुळे २०२१-२२ मध्ये जोरदार कामगिरीनंतर आयपीओ बाजारात येणाऱ्या आर्थिक वर्षात देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळणार आहे.As many as 97 companies will raise Rs 2.25 lakh crore through IPOs in the coming financial year

दरम्यान आतापर्यंत एलआयसीसह इतर ४३ कंपन्यांना बाजार नियामक सेबीने आयपीओसाठी मंजुरी दिली असून, आणखी ४३ कंपन्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या ५४ कंपन्या एकूण १.४० लाख कोटी रुपये गोळा करणार असून, ८१ हजार कोटी रुपयांसाठीचे ४३ आयपीओंचे अर्ज सेबीकडे आले आहेत. त्यामुळे त्यांनाही सेबी लवकरच मंजुरी देण्याची शक्यता देण्यात येत आहे.

आता ना पेट्रोल ना डिझेल ना गॅस तरी धावणार कार सुसाट…नवीन फंडा

तसेच रशिया-युक्रेन युद्ध संकटामुळे शेअर बाजारात आलेला चढउतार आणि कंपन्याची वाढती महागाई, व्याजदर वाढण्याचा परिणाम शांत होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने परिस्थिती निवळल्यानंतरच आयपीओ सादर करण्यात येणार आहेत. मात्र आयपीओ सादर केल्याने कंपन्यांना आपले उत्पादन विस्तारण्याची मोठी संधी मिळत आहे.

रिलायन्स जिओची कमी किमतीत शानदार प्लॅन ऑफर

कंपनीचा आयपीओ आकार (कोटी रुपयांत) एलआयसी ६५,०००, ओयो रुम्स ८,४३०, डेलिव्हरी ७,४६०, एपीआय होल्डिंग्स ६,२५०, भारत एफआयएच ५,००३, एमक्यूअर फार्मा ४,०००, गो एअरलाइन्स ३,६००, फाइव्ह स्टार फायनान्स २,७५२, जेमिनी इडिबल्स २,५००, आणि पारादीप फॉस्फेट्स २,२० अशा स्वरूपात आहे.

रेल्वे आता प्रवासच नाही तर ही विशेष सेवाही पुरवणार

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!