बजाजची स्वस्तामध्ये नवी बाईक आली, ट्रक घातली तरी काही होत नाही?
बजाजची नवी बाईक आली, ट्रक घातली तरी काही होत नाही?Bajaj's new bike arrived, nothing happens even if the truck is installed?

बिझनेस बातम्या
मुंबई, ता. 6 जुलै 2024 – बजाज कंपनीने बाजारामध्ये एक नवीन बाईक आणलेली आहे. ही बाईक सगळ्यांनाच धक्का देणारी आहे. कारण या बाईकची टेस्टी अश्या पध्दतीने घेण्यात आली की तिच्यावर ट्रक नेण्यात आली. टेस्टिंग करूनच ही सीएनजी बाईक आता मार्केटमध्ये आलेले आहे. जगातील पहिली सीएनजी बाईक जी आहे 125 क्षमतेची असून या बाईचे सुरुवातीची किंमत जी आहे ती 95 हजार रुपये इतकी आहे.
तीन वेरियंट मध्ये ही बाईक उपलब्ध झाली असून देशभरामधून त्याची बुकिंग सुरू झालेली आहे. बजाज फ्रीडम मध्ये या कंपनीने 125cc क्षमता ठेवलेली आहे आणि सिंगल सिलेंडर यामध्ये युज केलेला आहे. जो 9.5 पीएस पावर आणि 9.7 एन एम चा डार्क जनरेटर आहे.
या बाईकमध्ये दोन टॅंक देण्यात आलेले आहेत. एक टाकी सीएनजी साठी आहे आणि दुसरा टॅंक हा पेट्रोल साठी आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर दोन लिटर साठी पेट्रोल टॅंक आहे आणि दोन किलोग्रॅम साठी सीएनजी टॅंक आहे. कंपनीने असं दावा केला आहे की ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी वर 330 किलोमीटर पळणार आहे.
ही बाईक जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली त्यावेळेस लोकांनी प्रश्न विचारले ते ही गाडी रस्त्याच्या दृष्टीने चालवण्यासाठी किती सुरक्षित आहे.
याचे उत्तर पण कंपनीने दिलेलं आहे. कारण कंपनीने अकरा वेळा याची टेस्टिंग घेतलेली आहे. ट्रक खाली ही बाईक तुडविण्यात आलेली आहे तरी या बाईकला काही झालेले नाही असं तरी बजाज म्हणणं आहे. तशा पद्धतीचा व्हिडिओ पण बजाज कंपनीने दाखविलेला आहे.