बँक कर्मचारी संपावर
Business Batmya
मुंबई . गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक बँकांच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावर अनेक सार्वजनिक बँक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याच पार्श्ववभूमीवर येत्या फेब्रुवारी महिन्यात बँका संपावर जाण्याच्या पवित्र्यात आहे.
येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी बँका संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार बंद राहतील.
सेंट्रल ट्रेड युनियन (Central Trade Union- CTU) आणि इतर संघटनांनी संयुक्तपणे संपाबाबत घोषणा केली आहे.
या संपात देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.
मागील महिन्यात 17 आणि 18 डिसेंबरला या संदर्भात संप पुकारण्यात आला होता. बँकांचे सरकारकडून होणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता.
सेंट्रल ट्रेड युनियनसह अन्य संघटनादेखील या संपात सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन दिवस बँकांच्या शाखांमधील कामकाज ठप्प असेल.त्यामुळे ग्राहकांनी महत्वाचे व्यवहार या दिवसात करणे टाळावे.