उद्योग / व्यवसाय

Bank Job 2022 : बँकेत रिक्त पदांसाठी मोठी भरती एवढ्या जागा भरणार

business batmya

नवी दिल्ली : Bank Job 2022खासगी असो वा सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी मिळत असेल तर ती कोणाल नको असेल? बेरोजगार तरुण आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बँकेत 250 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करा करायचा जाणून घेऊया.Bank Job 2022: Large recruitment will fill up the vacancies in the bank

बडौदा यूपी बँकेमध्ये नोकरीची संधी आहे. 250 हून अधिक पदांसाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी barodaupbank.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करायचा आहे. दिलेल्य जाहिरातीनुसार जनरल 103 तर ओबीसी 67, एससी 52, ईडब्ल्यूएस 25 तर एसटीसाठी 3 जागा आहेत.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

ओपन, OBC आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अर्जासोबत 450 रुपये परीक्षा फी भरायची आहे. तर बाकी उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरायचं आहे. 15 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.

कसं भरायचा अर्ज?
सर्वात आधी गुगल क्रोममधून barodaupbank.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे गेल्यानंतर करियर पर्याय निवडा. तिथे तुम्हाला जाहिरात दिसेल. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लीक करा. तिथे नवीन लिंक येईल त्यावर जा. त्यांनी विचारलेली माहिती भरून अर्ज ऑनलाइन सबमिट करा.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये पगार मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!