घराच्या बाहेर पडण्याआधी पेट्रोल-डिझेलच्या किमती पहाचं…आज पुन्हा वाढ price of petrol-diesel

business batmya
मुंबईः price of petrol-diesel … increase again today आजंही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एका वाढ झाली आहे.
नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. तेल कंपन्यांनी 5 दिवसांत 4 वेळा किंमतींमध्ये वाढ केली आहे. Before going out of the house, look at the price of petrol-diesel … increase again today
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये प्रतिलिटर मिळत होतं. तर आता यामध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. याची किंमत 98.61 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीये. तर डिझेलची किंमत 89.07 रुपये होती. आता शनिवारपासून भाव वाढले असून 89.87 रुपये प्रति लिटर मिळणार आहे.
असं महागलं पेट्रोल
गेल्या 5 दिवसात तेलाच्या किमती 4 वेळा वाढल्या आहेत. म्हणजेच पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागलं आहे.कंपन्यांकडून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाचं बजेट बिघडलंय.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. या दोन्हींच्या किमती पुन्हा एकदा प्रतिलिटर 80 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्यामुळे आता लोकांना बेजार होण्याची वेळ आली आहे. पेट्रोल -डिझेल बरोबर महागाई इतकी वाढतं चालली आहे की गणित कोलमडत आहे. येत्या काही दिवसात अशी स्थिती राहिल्यास मोठी समस्या समोर उभी राहणार आहे.