इन्वेस्टमेंट

1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल

केंद्र सरकारकडून सोनं खरेदीच्या (Gold) नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. भारतात 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमांमध्ये (Gold Hallmarking Rule Changes) मोठा बदल करण्यात येणार आहे.

यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर परिणाम होणार आहे. 31 मार्च, 2023 नंतर हॉलमार्क (Hallmark) असलेलं सोनंच वैध मानलं जाईल. हॉलमार्क नसलेलं सोनं (Gold Jewellery without Hallmark) अवैध असेल. त्यामुळे जर तुम्ही 31 मार्चनंतर सोनं खरेदी करणार असाल तर या निर्णयाचा तुमच्यावर परिणाम होणार आहे.

Gold Hallmarking Rule Change : हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Consumers Affairs Ministry) दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपासून सोनं खरेदी करण्याच्या नियमांमध्ये हा बदल करण्यात येईल.

1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होतील. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) चिन्हाशिवाय कोणताही ज्वेलर्स सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Hallmarking Rule Change : 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू
देशात बनावट दागिन्यांची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Consumers Affairs Ministry) हॉलमार्कबाबत माहिती देत सांगितलं आहे. चार अंकी आणि सहा अंकी हालमार्क गोंधळामुळे मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सहा अंकी हॉलमार्क शिवाय सराफांना सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. तसेच मंत्रालयाने सांगितलं आहे की, आता चार अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्यात येतील. बनावट सोन्याची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.

What is HUID : हॉलमार्क म्हणजे काय?
HUID म्हणजे हॉलमार्क यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर. या क्रमांकावरून सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता समजते. सोन्याचे दागिने किंवा वस्तूवर हा क्रमांक असतो. या नंबरवरून सोन्याच्या दागिन्याबाबत संपूर्ण माहिती समजते. याआधी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क क्रमांक होते. मात्र, आता सरकारने चार अंकी हॉलमार्कवर बंदी घातली असून फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, 1 एप्रिलपासून हॉलमार्कशिवाय दागिने विकता येणार नाहीत, मात्र ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. देशभरात एकूण 1338 हॉलमार्किंग केंद्रं आहेत. आणखी हॉलमार्किंग केंद्रं उभारली जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!