सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर
Buisness Batmya
तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सध्या सरकारने आयात शुल्कात वाढ करूनही सोन्या-चांदीचे दर सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे आठवडाभरापूर्वी सलग तीन दिवसांची तेजी पाहिल्यानंतर आता सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आज सोन्याची किंमत 50656 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या इतकी आहे. एकेकाळी सोन्याच्या किंमतीने 56254 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, सोन्याचे दर पाहता सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
तर चांदीचा दर 55888 रुपयांच्या पातळीवरून 76008 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच उच्चांकीवरून चांदीची 20120 रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचे भाव वधारले तर चांदी घसरली.
व्हॉट्सॲप अपडेट करण्यासाठी तुम्हाला असे काही नोटिफिकेशन येत असेल तर सावधान!
दरम्यान बुधवारी इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या दरानुसार, सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 212 रुपयांनी घसरून 50656 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 209 रुपयांनी घसरून 55888 रुपये किलो झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी दुपारी सोने आणि चांदीच्या किमतीत संमिश्र कल दिसून आला. दुपारी 2 वाजता सोने किरकोळ वाढून 50,530 रुपयांवर होते. त्याचवेळी चांदी 56,432 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करीत होती.
Nokia चा नवीन C21 Plus स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स