फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान, एका लाखाचे झाले १८ हजार
Buisness Batmya
गेल्या तीन महिन्यात फ्युचर रिटेलचे शेअर्स 82.55 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे कर्जबाजारी फ्युचर रिटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण तीन महिन्यांपूर्वी ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांचे एक लाख रुपयाचे मूल्य आता सुमारे 18000 हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहे.Big loss for investors in Future Retail shares, one lakh to 18 thousand
तसेच हे असं कंपनीला सलग चौथ्या तिमाहीत 1063.36 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यासोबतच या शेअरची किंमत देखील सातत्याने घसरत असल्यामुळे या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 76.25 रुपये आणि निचांकी पातळी 8.15 रुपये आहे.
गेल्या एका आठवड्यात फ्यूचर रिटेलचे शेअर्स 21.2 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे ज्या गुंतवणुकदाराने यामधे एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याचे एक लाख आता 80 हजारांपेक्षा कमी झालेले असतील.
Share Market: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे दमदार 10 शेअर्स