Daily News

चांदवड मधून राहुल आहेर यांना भाजपाची उमेदवारी जाहिर

BJP's candidature for Raher Aher from Chandwad announced, what is the role of Raher Aher?

बिझनेस बातम्या / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 20 आॅक्टोबर 2024-  चांदवड, ता. चांदवड विधानसभा मतदारसंघासाठी ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल, कारण विद्यमान भाजपाचे आमदार राहुल आहेर यांना उमेद्वारी जाहिर करण्यात आली आहे. भाजपाची पहिली यादी आज प्रसिध्द कऱण्यात आली.   दोन वेळा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य राहिलेले आहे. मात्र होणा -या आगामी निवडणुकीमध्ये केदा आहेर यांनी मोठ्या प्रमाणात रणशिंग फुंकल्यामुळे केदा आहेर यांचा जोर व आक्रमता बघता, या दोन कुटुंबांमध्ये आपआपसात मध्यस्थी होऊन विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी माघार घेत भाजपातर्फे केला केदाआहेर यांना उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केल्याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती मात्र पक्षाने केदा आहेर यांना डावलतं विद्यामान आमदार राहुल आहेर यांनाचं उमेदवारी दिली.. वेगवान नाशिकवर देण्यात आलेलं वृत्त शंभर टक्के खरं ठरलयं. 

भाजपाने नाशिक शहरातील व चांदवड आणि बागलाण मधील विद्याामान आमदारांना उमेद्वारी कायम ठेवली आहे. इतर दुस-यांना चान्स दिला नाही.

चांदवड देवळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल आहेर यांची पत्रकार परिषद!
राहुल आहेर यांनी पक्षाला केदा आहेराना उमेदवारी देण्याची केली वरिष्ठांकडे मागणी.

वेगवान ला काय वाटतयं 

आमदार राहुल आहेर यांची विधानसभा निवडणूक रिंगणातून माघार! हे स्पष्ट झाले असले तरी वेगवान मीडिया याबाबत आपलं मत मांडत आहे.

चांदवडचे विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी चांदवड येथे पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा जो आहे तो पत्रकारां समोर मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी केदा आहेरांसाठी मी माघार घेत आहे.

मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करणार आहे. असे सांगितले आहे.  मात्र राहुल आहेर यांची मागणी पक्षश्रेष्ठ मान्य करतील का?

कारण राहुल आहेर हे दोनदा चांदवडचे आमदार राहिले आहे. आणि ते तिस-या विधानसभेसाठी इच्छुक असतांना ते अचानक माघार घेत आहे. केदानाना व आमदार राहुल आहेर हे भावबंदकीमुळे माघार घेत असेलही हे आम्ही मान्य करतो. पण पक्ष उमेदवारी देणार नाही. हे आम्ही या आगोदर मांडलं आहे.

केदा आहेर यांना या निमित्ताने संधी मिळणार होती.  मात्र राहुल आहेर हे दोन वेळा चांदवडचे आमदार झाले आहे. मात्र भाजपा हे कसं मान्य करु शकतं. कारण विद्यामान आमदारला डावलून भाजपाच्या पदाधिका-याला कसं उमेदवारी दिली जाईल हा कोड्यात टाकणार सवाल होता.मात्र देवेंद्र फडणवीस हे तो सब कुछ मुमकीन है..मात्र देवेंद्र फडणवीस आहे बर या  सर्व राजकारणामागे…हे आम्ही या अधिचं सांगितले होते.

आम्ही म्हटल्याप्रमाणे भाजपा पक्ष हे मान्य करील का की विद्यामान आमदाराला डावलून उमेदवारी देणे….आणि नाही केलं तर शेवटी राहुल आहेर हेच भाजपाचे पुढील उमदेवार असतील यात शंका नाही. हे आम्ही वृत्त वेगवान नाशिक डिजीटलवर दिलं होतं आणि आजं ते वृत्त खरं ठरलयं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!