BSNL एअरटेल आणि जिओला टक्कर देणार

Buisness Batmya
सध्या देशभरात BSNL २०२४ मध्ये 5G सेवा सुरू करणार असून BSNL ने 5G बाबत महत्त्वाचं विधान केले आहे.
BSNL ने 4G नेटवर्कसाठी TCS आणि C-DOT च्या नेतृत्वाखालील टीम शॉर्टलिस्ट केली असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली आहे.
Today Gold Price सोने झाले महाग, जाणून घ्या आजचे नवीन दर
दरम्यान याबाबत ओडिशामध्ये 5G सर्व्हिसचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, BSNL चं 5G नेटवर्क आल्याने आता जिओ आणि एअरटेलला जोरदार टक्कर दिली जाणार आहे. तसेच संपूर्ण ओडिशात 2 वर्षात 5G सेवा पूर्णपणे सुरू केली जाणार असून, आजपासून पहिल्या टप्प्यात भुवनेश्वर आणि कटकमध्ये 5G सेवा दिली जाणार आहे.
तसेच 26 जानेवारी 2023 पूर्वी राज्यात 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन वैष्णव यांच्याकडून देण्यात आले होते. तशी मोदी सरकारने राज्यातील दूरसंचार कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी 5,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
त्यात ओडिशातील 100 गावांमध्ये 4G सेवांसाठी 100 टॉवर्स सुरू करण्यात आले असून राज्यात जागतिक दर्जाच्या संपर्क सुविधा असलेले 5000 मोबाइल टॉवर्स बसवले जातील असेही वैष्णव यांनी यावेळी सांगितले.
Share Market: भारतीय शेअर बाजार तेजीत सुरूवात, सेन्सेक्स पुन्हा 61 हजारांच्या वर