Car offer महिंद्रा थारवर मिळतेय मोठी सूट
Mahindra Thar On Discount: भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचीथार एसयूव्ही कंपनीसाठी सर्वात जास्त विकणाऱ्या मॉडल्सपैकी एक आहे. परंतु, एप्रिल महिन्यात कंपनी आपल्या या कारवर मोठा डिस्काउंट ऑफर करीत आहे. ग्राहक थार 4X4 च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटच्या खरेदीवर ४० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देत आहे. ही एसयूव्ही AX (O) आणि LX सारख्या दोन ट्रिम्स मध्ये उपलब्ध आहे.
पॉवरट्रेन
यात तीन पॉवरट्रेन ऑप्शन दिले आहे. ज्यात ६ स्पीड मॅन्युअल आणि रिअर व्हील ड्राइव्ह सोबत आरडब्ल्यूडी सोबत १.५ लीटर डिझेल इंजिन, ज्यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, एक २.२ लीटर डिझेल इंजिन, ज्यात ४ व्हील ड्राइव्ह सिस्टम आणि मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि एक २.० लीटर पेट्रोल इंजिन रियर व्हील ड्राइव्ह सिस्टम सोबत उपलब्ध
याचे १.५ लीटर डिझेल आणि २.२ लीटर डिझेल इंजिन अनुक्रमे 300Nm/ 118bhp आणि 300Nm/ 130bhp चे आउटपूट जनरेट करते. तर पेट्रोल इंजिन 300Nm/ 152bhp चे आउटपूट जनरेट करते. थार 4X4 मध्ये एक इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंस मिळते. जे कमी ट्रॅक्शनच्या रस्त्यांवर गाडीला मजबूत पकड मिळते.
लवकरच येणार नवीन व्हेरियंट
मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी लवकरच या कारचे नवीन एन्ट्री लेवल 4X4 व्हेरियंट आणणार आहे. जे AX (O) ट्रिम खाली प्लेस केले जाणार आहे. यात 2.0L पेट्रोल किंवा 2.2L डिझेल इंजिन मिळू शकते. परंतु, यात AX (O) ट्रिम च्या तुलनेत कमी फीचर्स मिळतील.