Tomato price टोमॅटो बाबत केंद्राचा मोठा निर्णयःआता काय होईल
Center's Big Decision on Tomato: What Happens Now?

नवी दिल्ली-निर्मला सीतारामण यांनी संसदेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं.गेल्या नऊ वर्षात देशाने मोठे बदल पाहिले आहेत. याकाळातच सगळ्यात जास्त विकास पाहायला मिळाला. नऊ वर्षांपूर्वी आपली अर्थव्यवस्था कमकुवत होती, पण आता आपली अर्थव्यवस्था सगळ्यात जास्त गतीने वाढत आहे.
भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. देशभरातील गावात वीज पुरवठा करण्यात आलाय, जवळपास सर्व लोकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. तसेच आता स्वस्तामध्ये ओषधी लोकांना मिळू लागली आहेत, असं म्हणत अर्थ मंत्र्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.
देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. याच संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारने नेपाळकडून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मला सीतारामण यांनी बुधवारी संसदेत याबाबतची माहिती दिली. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी इतरही पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या.
दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटकमधून टोमॅटो खरेदी करण्यात आले आहेत. सबसिडीमध्ये टोमॅटो दिल्लीमध्ये देण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी संसदेत दिली.