शेती

कांदा खरेदीबाबत बाजारात हस्तेक्षेप करा, नाफेडसह एनसीसीपीला केंद्र सरकारचे निर्देश

Onion : सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे. याबाबत केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (National Cooperative Consumers Federation) ला निर्देश दिले आहेत.

गेल्या 10 दिवसात 4000 मेट्रीक टन कांद्याची खरेदी
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नाफेडने ताबडतोब कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. 24 फेब्रुवारी 2023 पासून खरेदी सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून 900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे 4000 मेट्रीक टन कांद्याची थेट खरेदी केल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. नाफेडने 40 खरेदी केंद्रे उघडली असून, तिथे शेतकरी त्यांचा कांदा विकू शकतात. त्याचे पैसे ऑनलाइन त्यांना मिळू शकतात. नाफेडने खरेदी केंद्रांवरुन दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या ठिकाणी साठा नेण्याची व्यवस्था केली आहे.

318 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होणार
वर्ष 2022-23 मध्ये कांद्याचे अंदाजे उत्पादन 318 लाख मेट्रिक टन होणार आहे. जे मागील वर्षीच्या 316.98 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे. मागणी आणि पुरवठा तसेच निर्यात क्षमतेमुळं किंमती स्थिर राहिल्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात लाल कांद्याच्या किंमतीत घसरण झाली. विशेषत: महाराष्ट्र राज्यात जिथे कांद्याला 500 ते 700/क्विटल पर्यंतचा दर मिळाला. दरातील ही घसरण इतर राज्यांतील एकूणच वाढलेल्या उत्पादनामुळं तसेच देशातील प्रमुख उत्पादक जिल्ह्यांतील म्हणजेच नाशिकमधील पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

कांद्याच्या राष्ट्रीय उत्पादनात 43 टक्क्यांसह महाराष्ट्राचा आघाडीवर
सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळं वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळं एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळं पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.

कांद्याचा 2.5 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठा ठेवण्यात येणार
गेल्या वर्षी नाफेडने ग्राहक व्यवहार विभागाच्या निर्देशानुसार बफर साठवणीसाठी 2.51 लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी केला होता. वेळेवर आणि नियमित वितरणामुळं किंमती अनियंत्रितपणे वाढत नसल्याची खातरजमा केली होती. सुरळीत पुरवठा सुनिश्चित करून साठवलेला कांदा देशभरात वितरित करण्यात आला. यावर्षी देखील ग्राहक व्यवहार विभागाने 2.5 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठा म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!