नाशिक सह या जिल्ह्यात काही तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Chance of rain with thunder in few hours in this district including Nashik
पश्चिमी झंझावातामुळं देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. देशाच्या काही भागांत पाऊस तर, काही भागांत हिमवृष्टी होताना दिसत आहे. सुरुवातीला या वातावरणामुळं उन्हाळ्यापासून नागरिकांची सुटका झाली होती. पण, आता मात्र नागरिकांच्या आरोग्यावर या हवामान बदलांचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहेत.
पुढील आठवड्यामध्ये तूर्तास कोणताही सक्रिय नसेल अशीच माहिती हवामान विभागानं दिल्यामुळं त्या दिवसांत तापमानामध्ये काही अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते. स्कायमेटच्या वृत्तानुसार पुढील काही दिवस हवामान कोरडं असेल. यादरम्यान, तापमान वाढ झाली तरीही वातावरण सर्वसामान्य असेल. कमाल तापमान 30 ते 32 अंशांच्या घरात राहील.
पुढील 24 तासांत देशातील हवमानाचा अंदाज वर्तवायचा झाल्यास, तेलंगाणा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग, आसाम, अरुणाचल प्रदेश या भागांत पावसाची हजेरी असणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ या भागांमध्येही पावसाच्या तुरळत सरी बरसतील असी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी सातारा, महाबळेश्वर, पाचगणी (Mahabaleshwar, Panchgani) भागात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर या भागात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतही पाणीच पाणी झालं. या अवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसणार असल्यामुळं सध्या बागायतदारांवर वेगळंच संकट ओढावलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्यात पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
७ एप्रिल, ७.३० am.
जिल्हे नांदेड, लातूर, उस्मानाबाद … TSRA🌩🌩
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढच्या २,३ तासात.
– IMD
मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ढगा़ळ आकाश .. pic.twitter.com/YTXNAQSwiT— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 7, 2023
नाशिक जिल्ह्यासह काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. मुंबई ठाणे, नाशिक, धुळे,नंदुरबार या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे.