टेक

Chang’e 6 Moon कोणत्याचं देशात हिंमत नाही, चीनने मात्र ही हिंमत केली ! जगावेगळं काहीतरी

business batmya / business News / बिझनेस बातम्या

मुंबई, ता.  7 में 2024  Chang’e 6 Moon Mission:  चीनच्या नव्या मोहिमेचं नाव Chang’e 6 असं आहे. चंद्राच्या अंधारी भागाकडे जाणारी ही चीनची दुसरी मोहीम आहे. चीनला जर यामध्ये यश मिळालं तर चंद्राच्या मागच्या बाजूचे पुरावे आणणारा जगातील पहिला देश आणि मोहीम ठरणार आहे. चीन या यशासह जगाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपली छाप उमटवेल.Now if your account is in this bank it will be closed..

आता तुमचं खातं जर या बॅंकेत असेल तर होणार बंद

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

चीनने चंद्रावर आपलं नवं यान पाठवलं आहे. हे यान चंद्रावर कायम अंधार असणाऱ्या भागावर पाठवण्यात आलं आहे. चंद्राचा हा भाग आपल्याला पृथ्वीवरुन दिसत नाही. चंद्राच्या या भागावर कधीच सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही. ज्याला Far Side किंवा Dark Side म्हणतात. जगातील कोणत्याही देशाने चंद्राच्या या भागावर जाण्याची हिंमत केलेली नाही.

आता तुमचं खातं जर या बॅंकेत असेल तर होणार बंद

3 मे 2024 रोजी वेनचांग स्पेस लाँच सेंटरमध्ये हे मिशन लाँच करण्यात आलं होतं. लाँचिग झाल्यानंतर 30 मिनिटांनी Chang’e 6 Moon Mission स्पेसक्राफ्टर याच्या CZ5 रॉकेटपासून वेगळं झालं होतं. चीनचं रॉकेट उद्या म्हणजेच 8 मे 2024 रोजी चंद्राच्या मागच्या बाजूला पोहोचेल.

THAR चे स्पर्धक Force Gurkha नवीन अवतारात लॉन्चः जबरदस्त फिचरःमर्सिडीज इंजिन,किमंत

या मोहिमेमागचा नेमका हेतू काय?

आपण जेव्हा पृथ्वीवरुन चंद्राला पाहतो तेव्हा आपल्याला चंद्राचा एकच भाग दिसतो. याला निअर साईड असं म्हणतात. याच्या मागच्या बाजूच्या भागाला डार्क किंवा फार साईड असं म्हणतात. याचं कारण हा भाग आपल्या डोळ्यांना दिसत नाही. चंद्राच्या या भागावर सूर्याचा प्रकाश पडत नाही.

महाराष्ट्रात शेतक-याला सापडली सोन्याची विहीर! पोलीसांनी केली विहीर सील video

मागील काही वर्षांपासून चंद्रावरील अंधारात असणाऱ्या भागाची बरीच चर्चा सुरु आहे. असं मानलं जातं की, चंद्राच्या फार साईडवरील जमिनीचा भाग फार जाड आहे. तेथील पृष्ठभागावर फार खड्डे आहेत. येथे मैदानी भागच नाही. तसंच या ठिकाणी कधी लाव्हादेखील वाहिलेला नाही. यासाठी चंद्राच्या या पृष्ठभागावरील नमुने आणण्यासाठी चीनने यान पाठवलं आहे.

Onion export शेतक-यांनी केंद्र सरकार झुकविलेःकांद्याची निर्यात खुली

Chang’e 6 Moon मोहीम 53 दिवसांची आहे. चंद्राच्या ऑर्बिटमध्ये पोहोचल्यानंर त्याचा ऑर्बिटर चंद्राच्या चारी बाजूंना फिरणार आहे. यानंतर लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असणाऱ्या एटकेन बेसिनवर उतरेल. एका मोठ्या दगडाच्या ध़डकेनंतर हा बेसिन तयार झाला आहे.

हे बेसिन आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा खड्डा आहे. चंगाई 6 हे अंतराळयान या ठिकाणाहून माती आणि दगडांचे नमुने घेणार आहे. जेणेकरुन शास्त्रज्ञ त्याचा तपास करून चंद्राचा इतिहास शोधू शकतील. हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर ड्रिल करेल. ते माती आणि दगडांचे नमुने घेईल, त्यांना चढत्या वाहनात ठेवेल आणि अंतराळात सोडेल.

यानंतर हे एसेंट व्हीकलऑर्बिटल सर्व्हिस मॉड्युलपर्यंत पोहोचेल. त्यानंतर हे मॉड्यूल पृथ्वीवर परत येईल. चीन हा जगातील एकमेव देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या गडद भागात सॉफ्ट लँडिंग केले आहे. 2019 मध्ये, त्याच्या Chang’e-4 मिशनने चंद्राच्या कारमान क्रेटर सॉफ्ट लँडिंग केलं होतं.

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!