टेक

गुगलच्या Play Store स्टोर पॉलिसीमध्ये बदल, कॉल रेकॉर्डिंग करणारी सर्व Android Apps होणार बंद

buisness batmya

Google च्या Play Store स्टोर पॉलिसीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यात Call Record करणारी सर्व Android Apps वापरता येणार नसून ती बंद होणार आहे. तर हा करण्यात येणारा बदल उद्यापासूनच बंद होणार आहे. तसेच Truecaller मध्ये देखील हे फिचर वापरता येणार नाही.Changes to Google’s Play Store policy, all call recording apps will be discontinued

त्यामुळे यामधील एक बदल म्हणजे कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद होणार असून तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅपचा वापर करून कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत. याबाबत कंपनीनं आधीच माहिती दिली होती. त्यात सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केली जाणार आहेत आणि तसेच कॉल रेकॉर्डिंग अॅप्स अनेक प्रकारच्या परवानग्या घेत असून त्याचा अनेक डेव्हलपर्स चुकीचा फायदा घेतात, असल्याच कंपनीनं म्हटल आहे.

याशिवाय कॉल रेकॉर्डिंग अॅप्सबाबत निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळे कायदे आहेत. यामुळे कंपनी यात बदल करत आहेत. गुगलच्या नव्या पॉलिसीप्रमाणे कॉल रेकॉर्डिंग्स उद्यापासून बंद होतील. या पॉलिसीमुळे ट्रूकॉलरच्या माध्यमातूनही रेकॉर्डिंग करता येणार नाही.

इनबिल्ट रेकॉर्डिंग अॅप्स सुरू राहणार

ज्या स्मार्टफोन्समध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अॅप्स देण्यात आली आहेत, ती मात्र काम करत राहणार आहेत. आणि जर तुमच्या मोबाइलमध्ये पहिल्यापासून ही अॅप्स आहेत त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. मात्र ज्यांच्या मोबाइलमध्ये ही इनबिल्ट सेवा उपलब्ध नाही, त्या युझर्सना समस्या येणार आहेत. तसे नव्या पॉलिसीपूर्वीही कंपनीनं हे प्रयत्न केले होते. पण Android 10 मध्ये रेकॉर्डिंग डिफॉल्ट बंद ठेवण्यात आलं होतं. तेव्हा हे हटवण्यासाठी अॅप्सनं Accessibility API चा वापर करण्यास सुरूवात केली होती. परंतु आता गुगलच्या या पॉलिसीनंतर हेदेखील शक्य नाही.

(Share Market 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांचा झालाः1 लाखाचे झाले 35 लाख

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!