जिओचा स्वस्त प्लान! नेटफ्लिक्स, Amazon Prime आणि Disney + Hotstar, फक्त 399 रुपयांमध्ये

buisness batmya
Jio आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक उत्तम योजना बनवते आणि आता OTT चा ट्रेंड वाढत असल्याने कंपन्या अनेक प्रकारचे सबस्क्रिप्शन प्लॅन देखील ऑफर करत आहेत. तर Jio त्याच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मोफत Netflix, Amazon Prime आणि इतर स्ट्रीमिंग अॅप्सचा लाभ देते. चला तर जाणून घेऊया Jio पोस्टपेडच्या त्या योजनांबद्दल..
या पोस्टपेड प्लॅनची सुरुवातीची किंमत 399 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. यामध्ये ग्राहकांना दरमहा 75GB डेटा मिळतो. तसेच 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS चा लाभ दिला जातो.
सोने दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
विशेष बाब म्हणजे हा प्लान केवळ नेटफ्लिक्सला मोफत देत नाही तर Amazon Prime आणि Disney + Hotstar वर मोफत प्रवेश देखील देतो. तसेच, या प्लानचे सब्सक्रिप्शन Jio अॅप्स मोफत उपलब्ध आहे.
दुसऱ्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना Jio पोस्टपेड प्लॅनमध्ये 599 रुपयांचा प्लॅन देखील मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100GB डेटा दिला जातो. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS चा लाभ दिला जातो. तसेच या प्लॅनचे सदस्यत्व म्हणून, ग्राहकांना Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar वर मोफत प्रवेश मिळेल. याशिवाय कुटुंब योजनेअंतर्गत 1 अतिरिक्त सिम कार्ड दिले जाते. तर, या प्लानचे सब्सक्रिप्शन Jio अॅप्स मोफत उपलब्ध आहे.