महाराष्ट्र

Cheapest recharge सर्वात स्वस्त रिचार्ज! Jio कडे, ते पण 100 रुपयांपेक्षा खुप कमी

business batmya

नवी दिल्लीः : Cheapest recharge! To Jio it is but less than 100 rupees  कमी किंमतीत येणाऱ्या प्लान्समध्ये जास्त डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. गेल्यावर्षी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर आता सुरुवाती प्रीपेड रिचार्जची किंमत जवळपास १०० रुपये झाली आहे.Cheapest recharge! To Jio it is but less than 100 rupees

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक यूजर्स प्लान्स आणत असतात.

मात्र, Reliance Jio कडे एक असा प्लान आहे, जो खूपच स्वस्त आहे. या प्लानमध्ये कॉलिंगसह डेटाचा देखील फायदा मिळेल. परंतु, या प्लानचा फायदा घेण्यासाठी तुम्ही JioPhone यूजर असणे गरजेचे आहे. या स्वस्त प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया

JioPhone ७५ रुपयांचा प्लान

या प्लानची वैधता ३ दिवस आहे. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा दिली जात आहे. यात ५० एसएमएस मोफत मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud या अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये यूजर्सला एकूण २.५ जीबी डेटा दिला जात आहे. यात दररोज १०० एमबीसह अतिरिक्त २०० एमबी डेटाचा फायदा मिळतो.

 

JioPhone यूजर्ससाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा आणखी एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची किंमत ९१ रुपये असून, यात देखील अनेक बेनिफिट्स मिळतात. ९१ रुपयांच्या या प्लान्सची वैधता २८ दिवस आहे. यात दररोज १०० एमबीसह २०० एमबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळतो. म्हणजेच, संपूर्ण कालावधीसाठी एकूण ३ जीबी डेटा मिळतो. तसेच, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यात ५० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!