सोन खरेदी करण्यापूर्वी आजचे सोन्याचे नवीन दर तपासा

Buisness Batmya
जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली. सोन्याचा भाव पुन्हा ५१ हजारांच्या जवळ पोहोचला आहे.Check out today’s new gold prices before buying gold
मल्टीकमोडिटी एक्सचेंज वर मंगळवारी सकाळी 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सचा भाव 55 रुपयांनी वाढून 50,790 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव 205 रुपयांनी वाढून 60,949 रुपये प्रति किलो झाला. मात्र, सकाळी सोन्याचा व्यवहार 50,827 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सुरू झाला. परंतु, मागणी कमी झाल्याने त्याची किंमत थोडी कमी झाली. तसेच आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
Telegram चे Telegram Premium लाँच, काही खास फीचर्ससाठी मोजावे लागतील इतके पैसे
सध्या MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,760 वर आहे, तर चांदीचा भाव 61,110 प्रति किलो आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. जागतिक बाजारपेठेतही सोन्याचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे त्याचे भाव वाढतील.
7 वा वेतन आयोग: सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार मोठी वाढ