नाशिक जिल्ह्यात दुस-यांदा ढगफुटी, मिळेल त्या दिशेने पाणी मार्गस्त (व्हिडिओ)
नाशिक जिल्ह्यात दुस-यांदा ढगफुटी, मिळेल त्या दिशेने पाणी मार्गस्त

बिझनेस बातम्या
चांदवड, ता. 21 आॅक्टोबर 2024- चांदवड तालुक्यामध्ये सलग चार-पाच दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडत आहे. यामुळे चांदवड तालुक्याचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे.
दोन दिवसापूर्वी चांदवड तालुक्यामध्ये ढगफुटीचा पाऊस झाला होता. आणि यामध्ये बाईक पाण्यात बुडाल्या तर दुकानामध्ये पाणी घुसले होते. रेणुका कॅम्पलेक्स मधील अवधुत पेस्टसाईड या दुकाना पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तसेच वडबारे परिसरात शेततळे वाहून गेले. एवढंच नाही तर ढगफुटीच्या पाण्यामुळे तलाव हे फुटून गेलेले होते. एवढेच नाही तर यामध्ये अनेक जनावर दगावली.
आज पुन्हा चांदवडच्या पूर्व भागामध्ये जोरदार असा पाऊस झाल्यामुळे नद्यांना पुर आला. शेतात दोन फुट पाणी साचल्यामुळे कांदा पिकाची पूर्ण वाट लागली आहे.
चांदवड तालुका कांदा पिकासाठी महत्वाचा तालुका असून चांदवड तालुक्याचे नगदी पिक हे कांदा असून पोळ कांदा चांदवड तालुक्यात घेतल्या जातो. या झालेल्या पावसामुळे सर्व वाहून जात आहे.
शेतक-यांची मका, सोयाबीन, भुईमुंग यांचे मोठं नुकसान झालयं. आज चांदवड तालुक्यातील डोणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचे मोठं नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातही आज पावसाने चांगलीच बॅटींग केली.