क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून 24 तासात $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट, भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा

Buisness Batmya
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या वापरा विरुद्ध सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की क्रिप्टोकरन्सी भारताच्या आर्थिक स्थैर्याला हानी पोहोचवू शकते. तसेच दास यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, क्रिप्टोकरन्सी देशाच्या आर्थिक स्थिरतेवर देखील परिणाम करू शकते. कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून केवळ 24 तासांत जवळपास $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट केली.Cryptocurrency market destroys $ 200 billion worth of assets in 24 hours, warns Indians to be cautious
त्यामुळे गव्हर्नर म्हणाले तुम्ही त्याचे नियमन कसे करता यावर मोठे प्रश्न आहेत. पण आमची भुमिका अगदी स्पष्ट असून, या चलनामुळे भारताच्या आर्थिक आणि व्यापक आर्थिक स्थिरतेला गंभीरपणे नुकसान होणार आहे. तसेच आरबीआय गव्हर्नरने क्रायोटोकरन्सीच्या वापराविरूद्ध चेतावणी देण्याची ही पहिलीच वेळ नसून या वर्षी फेब्रुवारीमध्ये द्वि-मासिक गुंतवणूकदारांचे बजेट जाहीर करताना, दास यांनी गुंतवणुकदारांना ट्यूलिप बबल लागू करण्यापासून सावध केले होते.
दरम्यान खाजगी क्रिप्टोकरन्सी हा मॅक्रो-इकॉनॉमिक स्थैर्य आणि आर्थिक स्थिरतेसाठी मोठा धोका आहे. कारण गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते त्यांच्या स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करत आहेत. तसेच या क्रिप्टोकरन्सींना कोणतेही मूल्य नाही. त्यामुळे अगदी अलीकडे, RBI अधिकाऱ्यानी सावध केले की यूएस डॉलरवर आधारित क्रिप्टोकरन्सी वापरल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचे ‘डॉलरीकरण’ होऊ शकते, जे भारताला परवडणारं नाही.
सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी कार, शानदार लुकसह अप्रतिम फीचर्स