महाराष्ट्र

वातावरणातील बदलाने H3N2 विषाणूचा फैलाव

 

होळीपूर्वी देशात इन्फ्लूएंझा (H3N2 ) विषाणूचा कहर वाढत आहे. उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांमध्ये नव्या विषाणूची रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाप्रमाणे त्याची अनेक लक्षणे दिसून येत आहे. वातावरणात सतत होणारा बदल, रात्रीची थंडी, दिवसा उकाडा, मध्येच येणारा पाऊस, ढगाळ हवा यामुळे विचित्र आजार वाढत आहेत. सर्दी, खोकला, तापाची साथ पसरली आहे. (H3N2 virus hits India) दोन दिवसांपूर्वी आयसीएमआरने ‘एन्फ्लूएंझा ए’ चा उपप्रकार H3N2 हा विषाणू सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचा इशारा दिला होता. वातावरणातलं वाढलेलं प्रदूषणही व्हायरल साथींच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा अशी सूचना करण्यात आली आहे. (H3N2 Virus Outbreak In India)

कोरोना सदृश इन्फ्लूएंझा (H3N2 व्हायरस) देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून विविध प्रकारची लक्षणे दिसू लागली आहेत. किंवा इन्फ्लूएंझामध्ये, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. दोन्ही राज्यात सरकारकडून दक्षता येते आहे. त्याचवेळी महाराष्ट्रालाही दक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेजारी राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आता महाराष्ट्रात पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या विषाणूचा धोका वाढू शकतो, असे म्हटले आहे.

ही आहेत प्रमुख लक्षणे
कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता पुन्हा एका नव्या व्हायरसने डोकं वर काढले आहे. इन्फ्लूएंझा H3N2 या व्हायरसचे देशाच्या काही राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रामाणात रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत असून विविध प्रकारची लक्षणेही दिसू लागली आहेत. या इन्फ्लूएंझामध्ये कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनऊमध्ये अचानक इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सरकारकडून आता सतर्तकतेचा इशारा देण्यात आला असून रुग्णांची व्यवस्था रुग्णालयांमध्येही करण्यात येत आहे. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. याचा त्रास गर्भवती महिलांनाही होत असून स्वच्छता राखणे, गर्दी टाळली गेली तर यापासून धोका टाळता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!