पेट्रोल-डिझले माहित आहे का किती रुपये झालं राव आज!

Bussness batmya
मुंबई : आता निवडणुका संपल्यानंतर दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना बसत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ (Fuel Rates hike) करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत.Do you know how much petrol-diesel cost Rao today?
दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. तर, उबरनं देखील त्यांच्या सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.
केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. ऑईल कंपन्या रोज सकाळी दरवाढ जाहीर करतात. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमुळं ही प्रक्रिया थांबली होती.
आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.
चेन्नईतील पेट्रोलचा दर 109.36 रुपयांवर डिझेलचा दर 99.44 वर पोहोचला आहे.
कोलकातामधील पेट्रोलचे दर 113.43 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल 98.22 रुपयांना विकलं जात आहे.
पुण्यात पेट्रोलचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोलचे दर 118.29 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पॉवर पेट्रोलचे दर 122.79 रुपयांना विकलं जातंय. डिझेलचे पुण्यातील दर 101.01 वर पोहोचले आहेत. तर,सीएनजी गॅसची किंमत 62.20 रुपयांवर पोहोचले आहेत.
ठाणे 118.08 100.88
सातारा 119.03 101.73
सांगली 118.74 101.48
कोल्हापूर 118.91 101.65
लातूर 119.66 102.35
औरंगाबाद
120.28 102.85
नागपूर 118.84 101.58