इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार, जलद चार्जिंगसह कमी किमतीच्या बॅटरी मिळणार

buisness batmya
नवी दिल्ली- जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या दिशेने दररोज नवनवीन शोध सुरू आहेत. अलीकडे, IIT खरगपूरच्या संशोधकांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी नॅनो मटेरियल वापरून सोडियम आयन आधारित बॅटरी आणि सुपरकॅपेसिटर विकसित केले आहेत. सोडियम आयन बॅटरी लिथियम आयन बॅटरीपेक्षा खूप चांगल्या मानल्या जातात, कारण सोडियम नैसर्गिकरित्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यापासून बनवलेल्या बॅटरीची किंमत कमी आहे.
तसेच ज्यांनी सोडियम आयन-आधारित ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन केले आहे आणि संघाचे नेतृत्व केले आहे, ते स्पष्ट करतात की या बॅटरी खूप वेगाने चार्ज केल्या जाऊ शकतात आणि नंतर इलेक्ट्रिक सायकलसह एकत्रित केल्या जाऊ शकतात. तसेच याबाबत प्रोफेसर चंद्रा म्हणाले की सोडियम-आयन बॅटरी आणि सुपरकॅपॅसिटर लिथियम-आयन आधारित ऊर्जा साठवण उपकरणांशी ही स्पर्धा करू शकतात.
Honda ची नवीन DIO स्पोर्ट्स स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
त्यानंतर ते म्हणाले की ही ऊर्जा साठवण उपकरणे इलेक्ट्रिक वाहने आणि इतर अनेक उपकरणांमध्ये सहजपणे वापरली जाऊ शकतात आणि आयातित लिथियमवरील आपले अवलंबित्व दूर करेल, जे जगातील केवळ निवडक देशांमध्ये आढळते. तसेच सोडियम मटेरिअल लिथियम-आधारित मटेरिअलपेक्षा स्वस्त तर असतातच, पण त्यांची कार्यक्षमताही चांगली असते.
दरम्यान या बॅटऱ्या औद्योगिक स्तरावरील उत्पादनापर्यंत वाढवता येतात. सोडियम-आयन सेलपासून बनवलेली बॅटरी देखील कॅपेसिटर प्रमाणे शून्य व्होल्टमध्ये सोडली जाऊ शकते, ज्यामुळे ती इतर अनेक स्टोरेज तंत्रज्ञानापेक्षा एक सुरक्षित पर्याय बनते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत 10,000-15,000 रुपयांच्या श्रेणीत आणली जाऊ शकते. तसेच त्याचा हवामानावरही वाईट परिणाम होणार नसून या बॅटरी जलद चार्जही होऊ शकतात.
Samsung Galaxy F22 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, जाणून घ्या नवीन किंमत