सोने दरात घसरण
buisness batmya
कोल्हापूर : मागील गेले दोन महिन्यांपासून रशिया, युक्रेन युद्धामुळे सोने चांदीचे दरात सातत्याने वाढ होत होती. पण आता गेल्या चार दिवसांत या वाढत असलेल्या सोन्याचा दर दीड हजाराने कमी झाला असून, नवीन वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याच्या सणाला ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.तर सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ५३ हजार ५०० वरून ५२ हजारांवर आला आहे.Falling gold prices
दरम्यान सोन्याचा दर १० ग्रॅमला ५३ हजार ५०० पर्यंत वाढला होता. परंतु हा वाढलेला दर चार दिवसांत कमी होत असून, बुधवारी ५१ हजार ५०० वर आला आहे. मात्र, गुरुवारी पुन्हा त्यात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तरीदेखील हा दर मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे ग्राहकांना सणाच्या मुहूर्तावर उतरलेल्या दराने सोन्याची खरेदी करता येणार आहे.
नवीन आर्थिक वर्षात हे महत्वाचे बदल- अर्थमंत्री निर्मला सितारमण
तसेच सणानिमित्त शनिवारी सराफ बाजार बंद असतो, परंतु गुढीपाडवा सणाला सोने-चांदीच्या अलंकारांची आवर्जून खरेदी केली जाते. त्यात गेले दोन वर्षे कोरोनामुळे विविध कारणाने बाजार बंद राहिल्यामुळे सराफ व्यावसायिकांचे तर नुकसान झालेच शिवाय ग्राहकांनाही आपल्या पसंतीनुसार दागिने खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. पण, आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने शनिवारीदेखील सराफ बाजार सुरू राहणार आहे.