
business batmya
नवी दिल्लीः Get a loan तुमच्याकडे कितीही पैसा (Money ) असला तरी आपल्या गरजा आनंत आहे आणि गरजा आनंत असल्यामुळे आपल्याला पैशाची गरज भासतेच, आपल्या गरजांमुळे आपल्याकडे पैसा शिल्लक नसतो आणि आपल्याला कर्ज (loan ) घेण्याची वेळ येते, आपण बँकेत जाऊन कर्जही घेतो, मात्र धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं कर्ज वेळेवर बँकेत पोहोचत नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि यामुळे आपला सिबिल स्कोअर ( CIBIL score ) खराब होतो. (find-a-way-to-get-a-loan-if-the-cibil-score-is-bad )
आपण कर्ज भरत नसल्यामुळे आपल्यावर कर्जाचा डोंगर हा मोठ्या प्रमाणात वाढत जातो आणि मग काय होतं, विचार टेन्शन आणि ताण तणावर या कच्याट आपण सापडतो. याच्यातून आपल्याला कशा पद्धतीने मार्ग काढायचा आहे,कोणत्या पद्धतीने आपण मार्ग काढला पाहिजे या गोष्टी या ठिकाणी फार महत्वाचे आहे. आपण जाणून घेतल्या पाहिजेत .
का होतो सिबीर स्कोअर खराब
डिफॉल्ट कर्ज किंवा विहित वेळेत कर्ज रकमेची पूर्ती न केल्यामुळे सिबिल स्कोअरवर परिणाम होतो. समान परिस्थिती कर्ज डिफॉल्ट होण्यावेळी निर्माण होते. कर्ज डिफॉल्टच्या स्थितीत सिबिल स्कोअर कमी होतो. त्यामुळे कर्ज मिळविण्यास अडचणी निर्माण होतात किंवा अधिक प्रक्रिया शुल्कासहित व्याजदराचा भुर्दंड सहन करावा लागतो.
सिबिल स्कोअर मधील घसरणीचा परिणाम दीर्घकालीन असतो का? सिबिल स्कोअर सुधारणेची संधी मिळते का? सिबिल स्कोअरची कामगिरी उंचाविण्याची संधी निश्चितच मिळते. त्यामुळे भविष्यात कर्ज मिळविण्याच्या अधिक शक्यता निर्माण होतात.
काही कारणामुळे आपण कर्ज फोडू शकत नाही मात्र नंतर तुम्ही ते भरु शकतात. कारण जीवनात अनेक अडथळे आहे. यावर मार्ग निघतो. आर्थिक स्थिती रुळावर आल्यावर तुम्ही थकित कर्जाचे हफ्ते व व्याजही अदा केले. तुम्हाला सिबिल स्कोअर सुधारण्याची आशा निर्माण झाली. तुम्ही व्यक्त केलेली आशा निश्चितच योग्य आहे. मात्र, अर्थतज्ज्ञांच्या मते सिबिल स्कोअरवरील परिणाम किमान दोन वर्षांसाठी कायम राहतो. थकित हफ्त्यांची वेळेत पूर्तता असो किंवा व्याजाची पूर्तता मात्र सिबिल स्कोअरवरील परिणाम दोन वर्षांसाठी कायम राहतो. तुमच्या वित्तीय गरजांवर थेट परिणाम दिसून येतो.
अर्थव्यवहारावर इफेक्ट:
तुम्ही गृह कर्ज घेण्यासाठी बँकेकडे गेल्यास किंवा कार लोनची फायनान्स एजन्सीकडे मागणी केली तुमचा निगेटिव्ह सिबिल स्कोअर अडथळा ठरू शकतो. तुम्ही अन्य मार्गाने कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अधिक व्याजदरानेच कर्ज घ्यावे लागेल. तुमचा सिबिल स्कोअर अर्थजगतात सर्वत्र पोहोचतो. तुमच्या सिबिल स्कोअरची निगेटिव्ह रँकिंग प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेकडे अद्ययावत असते.
सिबिल कसा सुधारावा?
क्रेडिट कार्ड बंद झाल्यानंतर बँकेचे त्वरित प्रमाणपत्र घ्या. सर्व गोष्टींमुळे सिबिल स्कोअर सुधारतो. तुमच्या बिलांचे पेमेंट वेळेवर करा. वेळेत बिल अदा करा आणि क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल भरा. या आर्थिक कृतीमुळे सिबिल स्कोअरमध्ये सुधारण्याची शक्यता असते. तुमचे विहित वेळेतील आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट कार्ड सारख्या छोटे-मोठे बिल देय करण्याद्वारे सिबिल स्कोअरमध्ये सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी येते. कर्ज वेळेवर अदा करुनही बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले जात नाही. त्यामुळे सिबिल स्कोअर निगेटिव्ह होतो.