आता स्वस्त व्याजदरात मिळणार गृहकर्ज, जाणून घ्या
Buisness Batmya
नवी दिल्ली : सध्या प्रत्येक व्यक्ती मोठ्या घराचे स्वप्न पाहत असतो. आणि तेही स्वतःचे असले पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येकजणाची असते. तर त्यासाठी गृहकर्ज घ्यावे लागते. अशातच एलआयसी आता तुमच्यासाठी एक संधी घेऊन आली असून, गृहकर्ज घेणा-यांसाठी एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने स्वस्त व्याजदरात गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. जर त्यात तुम्ही एलआयसीकडून गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला किमान 6.66 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.Find out now how to get a home loan at a cheaper interest rate
एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणुकदारांना 94 हजार कोटी रूपयांचा फटका
मात्र, रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर कंपनीनेही आपले दर बदलले असून बुधवारी, पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक व्याज वाढवणार आहे, त्यामुळे कर्जाचे दर देखील बदलण्याची शक्यता आहे. तसेच यात कर्ज घेऊ शकणा-यांमध्ये जे लोक कोणत्याही व्यवसायाशी संबंधित आहेत आणि त्यांचा सिबिल स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना कर्ज घेण्याची सुविधा आहे.आणि हे कर्ज मर्यादित कालावधीसाठी असून, जे फक्त 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वैध असणार आहे.
तसेच जर तुम्ही एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून गृहकर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला एकूण मालमत्तेच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. आणि तुम्ही जर 30 ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार. त्यामुळे तुम्ही 75 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले तर तुम्हाला मालमत्तेच्या मूल्याच्या 75 टक्के रक्कम मिळेल.
सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम