महाराष्ट्र
सोनं चांदीचे आजचे दर, जाणून घ्या

Buisness Batmya
मुंबई : गेल्या 24 तासांत भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत चढ-उतार झाले असून, जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये आज वाढ नोंदवण्यात आली.Find out today’s gold and silver prices
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर वाढीसह सोने 51007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करीत होते. त्याचबरोबर चांदीमध्येही चांगली तेजी नोंदवली गेली. चांदी 986 रुपयांनी वाढून 62655 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते. तर सराफा बाजारात देखील सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांनीही गर्दी केली आहे.
एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणुकदारांना 94 हजार कोटी रूपयांचा फटका
देशात आज 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा दर 51,200 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 46,900 रुपये आहे. मुंबईतील सोन्याच्या दर 52,090 रुपये प्रति तोळे इतके होते तर चांदीचे दर 61,700 रुपये प्रति किलो इतके होते.
तसेच किरकोळ बाजारात सोन्याच्या दागिन्यांचा दर जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळवता येऊ शकते.