उद्योग / व्यवसाय

सोन चांदीचे आजचे दर, जाणून घ्या

Buisness Batmya

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर सातत्याने वाढताना दिसत होता. मात्र आज सकाळी भारतीय बाजारात सोन्याच्या दर घसरला आहे. तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. यावरून एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 82 रुपयांनी घसरून 51,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.Find out today’s gold and silver prices

मात्र चांदीच्या दरात फारसा बदल झालेला नसून किंचित वाढ दिसून आली आहे. तर मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी चांदीचा दर 10 रुपयांनी वाढून 61,986 रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. यापूर्वी चांदीचा दर 61,996 रुपये एवढा होता. पण आता चांदीची किंमत 0.02 टक्क्यांनी वाढून 62 हजारवर पोहोचली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनच्या नियमात बदल

दरम्यान सोन्याचा भाव हा लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँका एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवत असतात, यामध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड, अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. तर इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.

सोन्याचा भाव ठरवण्यात  इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा सहभाग असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. ते खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो.आणि मग
आपल्या बँका सोने परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.

खाद्यतेलाच्या दरात इतक्या रुपयांनी घसरण

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!