महाराष्ट्र

महाराष्ट्रात चार दिवस पाऊस…कोणत्यात जिल्ह्यात होणार पाऊस

पुणे : राज्यात फेब्रुवारी महिना सर्वात हॉट ठरला होता. १९०१ नंतर आतापर्यंतचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना राहिला होता. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सियसवर गेले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. यामुळे यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु राज्यातील वातावरण बदलले आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच ४ ते ८ मार्च दरम्यान राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे आणि जालन्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई हवामान विभागाने यांनी ४ ते ७ मार्चसाठी हा इशारा दिला आहे. त्यानुसार, ४ ते ८ मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी
राज्यात पाऊस पडणार आहे, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. शेतीमालाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे शेतातील पिकांवर रोगराई पसरण्याचा धोका आहे. शेतातील काढणीआणि लागलीच मळणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

‘ला-नीना’ निरोप

सलग तीन वर्षे चांगला मान्सून दिल्यानंतर ‘ला-नीना’ निरोप घेतला. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो. जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. अमेरिकेच्या हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने दिलेल्या अहवालात हा इशारा दिला आहे. आता पुढील तीन महिने मध्य फेब्रुवारी ते मध्य एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अल निनोचा भारतातील मान्सूनच्या पावसावर थेट परिणाम होणार असल्याचे NOAAने म्हटले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात अल निनोबाबत अमेरिकेच्या हवामान संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारीमध्येही एजन्सीने असाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जानेवारीच्या अहवालात जुलैनंतर अल निनोची स्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!