गौतमी पाटील आज नाशिक जिल्ह्यात, गर्दी वाढणार
वेगवान नाशिक
नाशिक : सबसे कातील असं म्हंटल्यावर आपसूकच गौतमी पाटील ( Gautami Patil ) असं नाव ज्याच्या तोंडून बाहेर पडणार नाही असा माणूस सध्या शोधून सापडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ( Maharashtra News ) गौतमी पाटील हे नाव परिचित झाले आहे. गौतमी पाटील या नृत्यांगणेने ( Gautami Patil Dance ) महाराष्ट्रातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे.
गौतमी पाटील ज्या कार्यक्रमाला असते तिथे तरुणाईची तूफान गर्दी होत असते. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात मागे एकाचा मृत्यूही झाला होता. इतकच काय तर गौतमी पाटील स्टेजच्या खालून दिसत नाही म्हणून झाडावर बसून तरुणांनी लावणी पहिली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात गौतमी पाटील ही नृत्यांगना सर्वांनाच परिचित आहे. याशिवाय गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद होण्याच्या घटनाही यापूर्वी समोर आल्या आहे.
रील स्टार, नृत्यांगना म्हणून परिचित असलेली गौतमी पाटील ही नाशिकमध्ये आहे. गौतमी पाटील हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इतकंच काय तर अनेकदा तिने केलेल्या नृत्यावरून वादही उभा राहिला आहे. तरी देखील गौतमी पाटील हिची मागणी कमी झालेली नाही.
गौतमी पाटील ही आज नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे येणार आहे. रायगड ग्रुपच्या वतीने गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात त्यामुळे आज निफाडमध्ये तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे.