टेक

या दोन नव्या लॅपटॉपवर मिळतेय बंपर ऑफर , जाणून घ्या फीचर्स

buisness batmya

Honor ने भारतात दोन लॅपटॉप मॉडेल सादर केले आहेत. ज्यांनी MagicBook X 14 आणि MagicBook X 15 नावानं एंट्री घेतील असून , असे दोन लॅपटॉप भारतात लाँच झाले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप विंडोज 10 सह देशात आले आहेत आणि लवकरच यांना Window 11 चा अपडेट मिळेल. कंपनीनं यात 10th-gen Intel Core प्रोसेसरचा वापर केला आहे.Get bumper offers on these two new laptops, find out the features

Honor MagicBook X 14 चे स्पेसिफिकेशन्स

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

Honor MagicBook X 14 मध्ये 14-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस अँटी-ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला TUV Rheinland लो ब्लु लाईट आणि फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन मिळालं आहे. यात एक बॅकलिट कीबोर्ड आणि पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. लॅपटॉपमधील पॉप-अप वेबकॅम 720p HD रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच या लॅपटॉपमध्ये Intel Core i5-10210U पर्यंतचा प्रोसेसर, Intel UHD ग्राफिक्स, 8GB पर्यंत DDR4 RAM आणि 512GB PCIe SSD स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये 56Wh ची बॅटरी आहे, जी 13.2 तासांचा बॅकअप देते. MagicBook X 14 सोबत 65W फास्ट चार्जर मिळतो.

gold-prices सोन्याचे दर स्थिर; चांदीच्या दरात किंचित घसरण

Honor MagicBook X 15 चे स्पेसिफिकेशन्स

Honor MagicBook X 15 मध्ये 15.6-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस अँटी-ग्लेयर डिस्प्ले आहे. यात एक बॅकलिट कीबोर्ड आणि पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. लॅपटॉपमधील पॉप-अप वेबकॅम HD रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.कंपनीनं यात Intel Core i3-10110U प्रोसेसरसोबत Intel UHD ग्राफिक्स, 8GB DDR4 RAM आणि 256GB PCIe SSD स्टोरेज दिली आहे. या लॅपटॉपमधील 42Wh ची बॅटरी 7.8 तास चालते आणि 65W फास्ट चार्जरनं चार्ज करता येते.

स्वस्त अन् मस्त! Oneplusचा 43 इंचाचा Smart TV उद्यापासून

काय किंमत आहे लॅपटॅापची

Honor MagicBook X 14 चा Intel Core i3 प्रोसेसर असलेला मॉडेल 42,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर Intel Core i5 प्रोसेसरसाठी 51,990 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. Honor MagicBook X 15 ची किंमत 40,990 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत 12 एप्रिलपर्यंत 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हे लॅपटॉप अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येतील. तसेच यांची खरेदी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं केल्यास 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे.

Realme Narzo 50A Prime चा नवा स्मार्टफोन चार्जरशिवाय येणार भारतात, जाणून घ्या

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!