उद्योग / व्यवसाय
सोनं चांदी दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर
Buisness Batmya
काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोन खरेदीला तारांबळ होत आहे. त्यातच आता ग्राहकांसाठी खुशखबर असून सोन्याच्या किंमतीत 100 रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,१०० रूपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४७,८५० रुपये इतके आहे.Gold and silver prices fall, find out today’s prices
तसेच चांदीचा भावातही घट झाली असून १ किलो चांदीचा दर ६१,६०० रूपये इतका आहे. याआधी शनिवारी चांदीचा दर ६२,५०० रुपयांवर होता. दरम्यान सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. तर हा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. तर हे सोन्याचे भाव १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
आजचा शहरातील सोन्याचा भाव दिल्ली २४ कॅरेट 52,100 रूपये, २२ कॅरेट 47,750 रूपये, मुंबई २४ कॅरेट 52,100, २२ कॅरेट 47,750 रूपये, कोलकाता २४ कॅरेट 52,100 रूपये, २२ कॅरेट 47,750 रूपये, चेन्नई २४ कॅरेट 52260, 22 कॅरेट 47,920 अशा स्वरूपात आहे.